जुन्नर: चारित्र्याच्या संशयावरून 59 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या

जुन्नर: चारित्र्याच्या संशयावरून 59 वर्षीय पतीने केली 51 वर्षीय पत्नीची गळा आवळून हत्या
junnar crime 59 year old man murdered his 51 year old wife on suspicion of adultery(प्रातिनिधिक फोटो)

स्मिता शिंदे, जुन्नर: जुन्नर तालुक्यातील वडगाव कांदळी येथील 14 नंबर जवळील शिंदे मळ्यात शनिवारी (1 जानेवारी) रात्री एका 59 वर्षीय पतीने चारित्र्याच्या संशयावरून आपल्या 51 वर्षीय पतीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, संध्या सुरेश शिंदे (वय 51 वर्ष) या महिलेची त्यांचे पती सुरेश दगडू शिंदे (वय 59 वर्ष) यांनी 1 जानेवारी रोजी रात्री 12.30 वाजेच्या सुमारास गळा आवळून हत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर त्यांनी महिलेचा पती आरोपी सुरेश शिंदे याची सुरुवातीला चौकशी केली. त्यानंतर चौकशीत सुरेश शिंदे सहाय्य करत नसल्याने नारायणगाव पोलिसांनी त्याला अटक केली.

दरम्यान, पोलिसांनी सुरेश शिंदेला पोलिसी खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. आपणच चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची कबुली त्याने दिली. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांनी दिली.

आरोपी सुरेश शिंदे व मयत संध्या शिंदे यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वाद होत होते. चारित्र्यावरुन संशय घेत आरोपी सुरेश शिंदे हा सातत्याने पत्नी संध्या शिंदे हिच्याशी वाद घालायचा.

शनिवारी देखील सुरेश याने रात्री उशिरा आपल्या पत्नीसोबत वाद घातला. मात्र, यावेळी संताप अनावर झाल्यानंतर सुरेशने थेट आपल्या पत्नीची गळा आवळून हत्याच केली.

junnar crime 59 year old man murdered his 51 year old wife on suspicion of adultery
Pune Crime: पत्नीला फसवून नेलं बाहेर, चारित्र्याच्या संशयातून पतीने केली गळा चिरून हत्या

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाच पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धनवे करीत आहेत.

यावेळी आरोपीला इतरही कोणाचीही साथ होती का? याचाही पोलीस तपास करणार आहेत.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in