अजून एक काश्मिर तयार होतोय…, प.बंगाल निवडणूकीच्या ट्रेंडवरून कंगनाचा हल्लाबोल

मुंबई तक

कोरोनाच्या संकट काळात देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज निवडणूकानंतर मतमोजणी होत असून निकाल जाहीर होणारे आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री कंगना राणौतने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्विट करत तिचं मत व्यक्त केलंय. देशात अजून एक काश्मिर तयार होत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

कोरोनाच्या संकट काळात देशात पाच राज्यांमध्ये निवडणुका पार पडल्या. आज निवडणूकानंतर मतमोजणी होत असून निकाल जाहीर होणारे आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आघाडीवर असल्याचं चित्र आहे. यावर अनेकांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशातच आता अभिनेत्री कंगना राणौतने देखील तिची प्रतिक्रिया दिली आहे.

कंगनाने ट्विट करत तिचं मत व्यक्त केलंय. देशात अजून एक काश्मिर तयार होत असल्याचं कंगनाचं म्हणणं आहे. कंगनाचं हे ट्विट सध्या चांगलंच व्हायरल झालं आहे.

कंगना तिच्या ट्विटमध्ये म्हणते, “बांग्लादेशी आणि रोहिंगे ही ममता बॅनर्जी यांची सर्वात मोठी ताकद आहे. त्याचप्रमाणे सध्या जो ट्रेंड आहे त्यावरुन तर असं दिसतंय की, तिथे बहुसंख्य प्रमाणात हिंदू नाही आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या माहितीप्रमाणे, बंगाली मुस्लिम हा भारतातला सर्वाधिक गरीब आणि वंचित घटक आहे. छान…अजून एक काश्मिर तयार होतो आहे.”

या ट्विटच्या माध्यमातून कंगनाने ममता बॅनर्जी यांच्यावर निशाणा साधला आहे. 2021च्या विधानसभा निवडणुकीदरम्यान कंगना रणौत सतत आपलं मत व्यक्त करताना दिसली. कंगनाचा आगामी सिनेमा तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यावर आधारित आहे. ‘थलायवी’ असं या सिनेमाचं नाव असून याव्यतिरिक्त कंगना ‘धाकड’ आणि ‘तेजस’ सारख्या सिनेमांमध्ये दिसणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp