Kasba Peth Bypoll Results 2023 : कसब्यात भाजपला झटका, धंगेकरांनी उधळला गुलाल!
Kasba Peth Assembly By election results 2023। Hemant Rasane। Ravindra Dhangekar कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची प्रतिक्षा अखेर संपली असून, भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले आहेत. काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने तगडी फाईट देत मोठा विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी […]
ADVERTISEMENT

Kasba Peth Assembly By election results 2023। Hemant Rasane। Ravindra Dhangekar
कसबा पेठ विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपला मोठा झटका बसला आहे. कसबा पोटनिवडणुकीत कोण जिंकणार याची प्रतिक्षा अखेर संपली असून, भाजप-महायुतीचे उमेदवार हेमंत रासने हे पराभूत झाले आहेत. काँग्रेस-महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी हेमंत रासने तगडी फाईट देत मोठा विजय मिळवला आहे. रवींद्र धंगेकर यांनी तब्बल 11हजार 40 मतांनी हेमंत रासने यांचा पराभव केला आहे. रवींद्र धंगेकर यांना 73 हजार 194 मतं मिळाली, तर हेमंत रासने यांना 62 हजार 244 मतं मिळाली आहेत.
“सत्ता, पैसा आणि दडपशाही यांचा वापर करुनही भाजपला विजय मिळवता आला नाही कारण जनतेला भाजपचं खरं रुप कळलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो किंवा मग आताची ही पोटनिवडणूक भाजपला उतरती कळा लागली आहे हे नक्की”, अशी प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे.
सत्ता, पैसा आणि दडपशाही यांचा वापर करुनही भाजपला विजय मिळवता आला नाही कारण जनतेला भाजपचं खरं रुप कळलं आहे. शिक्षक-पदवीधर मतदारसंघाची निवडणूक असो किंवा मग आताची ही पोटनिवडणूक भाजपला उतरती कळा लागली आहे हे नक्की.
महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. रविंद्र धंगेकर यांचे हार्दिक अभिनंदन. pic.twitter.com/xGlBWeJ6IM
— Maharashtra Congress (@INCMaharashtra) March 2, 2023