Kirit Somaiya: सोमय्या-हसन मुश्रीफ आमनेसामने, आरोपांचा धुरळा; नेमकं प्रकरण काय?
मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. ज्यानंतर याच प्रकरणी कोल्हापुरात जाण्यासाठी निघालेल्या सोमय्या यांना साताऱ्यातच रोखण्यात आलं. त्यामुळे भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ […]
ADVERTISEMENT

मुंबई: भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी महाराष्ट्र सरकारमधील ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यावर तब्बल 127 कोटींचा घोटाळ्याचा आरोप केला आहे. ज्यानंतर याच प्रकरणी कोल्हापुरात जाण्यासाठी निघालेल्या सोमय्या यांना साताऱ्यातच रोखण्यात आलं. त्यामुळे भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीवर जोरदार टीका करण्यात येत आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर मात्र सोमय्यांनी गंभीर आरोप केले आहेत. जाणून घेऊयात नेमके आरोप काय आहेत.
उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह आणि कुटुंबाच्या नावाने असणाऱ्या कंपन्यांद्वारे मनी लाँडरिंग आणि कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचार केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
सोमय्यांनी या प्रकरणी सप्टेंबर महिन्यात ईडीकडे तक्रार दाखल केली आहे. तसेच या संबंधीचे पुरावे अर्थ खात्याच्या सचिवांकडे देखील देण्यात येणार आहेत.
सोमय्या यांचे नेमके आरोप काय?