लतादीदी मी तुमचा ऋणी आहे-राज ठाकरे

मुंबई तक

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनी लतादीदींचे आभार मानले आहेत. मी तुमचा ऋणी आहे लतादीदी या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याला कारण ठरलं आहे तो म्हणजे लता मंगेशकर यांनी ट्विट केलेला एक फोटो. राज ठाकरे यांनी ट्विट करून लतादीदींचं ऋण व्यक्त केलं आहे. काय म्हणाले आहेत राज ठाकरे? “मराठीपणाची ओळख […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी भाषा दिनी लतादीदींचे आभार मानले आहेत. मी तुमचा ऋणी आहे लतादीदी या शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याला कारण ठरलं आहे तो म्हणजे लता मंगेशकर यांनी ट्विट केलेला एक फोटो. राज ठाकरे यांनी ट्विट करून लतादीदींचं ऋण व्यक्त केलं आहे.

काय म्हणाले आहेत राज ठाकरे?

“मराठीपणाची ओळख ठसवायची असेल तर प्रत्येकाने मराठी स्वाक्षरी करायला हवी या आवाहनावर लतादीदींनी मराठीत स्वाक्षरी करून पाठवली आणि सोबत कुसुमाग्रजांसोबतचा फोटोही.. दीदी मी खरंच तुमचा ऋणी आहे.” असं म्हणत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लतादीदींचे आभार मानले आहेत. एवढंच नाही तर या फोटोशेजारी असलेलं ज्ञानेश्वरांचं चित्र हे उषा मंगेशकर यांनी रेखाटलं असल्याचीही माहिती राज ठाकरेंनी दिली आहे.

मराठी भाषा दिवसाबद्दल काय आहेत राज ठाकरे यांचे विचार?

हे वाचलं का?

    follow whatsapp