Maharashtra Bandh : आज ‘महाराष्ट्र बंद’! काय सुरु आणि काय असणार बंद?
मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ताधारी आघाडी असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने (MVA)शेतकऱ्यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील […]
ADVERTISEMENT

मुंबई: महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षाने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेची सत्ताधारी आघाडी असलेल्या महाराष्ट्र विकास आघाडीने (MVA)शेतकऱ्यांच्या हत्याकांडाचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारला आहे. शिवसेनेचे राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शनिवारी सांगितले की, त्यांचा पक्ष उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील शेतकऱ्यांच्या हत्येच्या निषेधार्थ 11 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र बंदमध्ये पूर्ण शक्तीने सहभागी होईल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पत्रकार परिषदेत बोलताना राऊत म्हणाले होते की, ‘केंद्र सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांविरोधात लोकांना जागृत करणे आवश्यक आहे. शेतकरी या लढ्यात एकटे नाहीत आणि त्यांच्यासोबत एकता दाखवण्याची प्रक्रिया महाराष्ट्रापासून सुरू झाली पाहिजे.’
पाहा महाराष्ट्र बंद आंदोलनादरम्यान नेमकं काय सुरु असणार