महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री करणार इंदोरीकर महाराजांचं ‘प्रबोधन’, लस घ्यावी यासाठी सांगणार चार युक्तीच्या गोष्टी!
बारामती: प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. असं असताना आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे. इंदुरीकर यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात मी स्वतः कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. […]
ADVERTISEMENT

बारामती: प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांनी कोरोना प्रतिबंधक लस घेण्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात आली आहे. असं असताना आता राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी इंदुरीकर यांच्या वक्तव्याबाबत लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी त्यांची समजूत काढणार असल्याचे सांगितले आहे.
इंदुरीकर यांनी नाशिक येथील एका कार्यक्रमात मी स्वतः कोरोनाची लस घेतलेली नाही आणि घेणारही नाही. असे वक्तव्य केले होते. ‘निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर यांना मी स्वतः वैज्ञानिक दृष्टीकोनातून लसीचे महत्त्व पटवून देईन.’ असे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.
‘त्यांच्या स्टाईलमध्ये केलेल्या प्रबोधनातून समाजामध्ये जागृती होते त्यामुळे त्यांच्या कीर्तनाला मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. गेल्या दोन वर्षांपासून कीर्तन आणि प्रबोधन बंद असताना त्यांचा समाजाशी जास्त संपर्क आलेला नाही. जागतिक स्तरावर लसीकरणाचे महत्त्व सगळ्यांनी जाणल आहे. महाराजांचा अध्यात्मिक अभ्यास जास्त आहे. मात्र, वैज्ञानिक बाजू देखील समजावून सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे.’ असं राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.
‘प्रबोधनकार-किर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख हे माझ्या अत्यंत परिचयाचे आहेत. ते ज्या पद्धतीने समाजाचे प्रबोधन करतात. समाजाला किर्तनाच्या माध्यमातून संदेश देतात, तो त्यांच्या स्टाईलमुळे लोकांना भावतो. त्यामुळे नागरिक त्यांच्या किर्तनाला मोठी गर्दी करतात.’