ऐन दिवाळीत MIDC ची पाईपलाईन फुटली, डोंबिवलीकरांचे हाल
मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रस्त्यावरची एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहत असून जवळपासच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शीळ रोडवरील चिंतामणी हॉटेलजवळ एमआयडीसीची पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहू लागले आणि जवळपास असलेले घरांमध्ये […]
ADVERTISEMENT

मिथिलेश गुप्ता, प्रतिनिधी, ठाणे
ठाणे जिल्ह्यातील कल्याण शीळ रस्त्यावरची एमआयडीसीची जलवाहिनी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहत असून जवळपासच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शीळ रोडवरील चिंतामणी हॉटेलजवळ एमआयडीसीची पाण्याची जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले. रस्त्यांवर पुरासारखे पाणी वाहू लागले आणि जवळपास असलेले घरांमध्ये पाणी शिरले.
गेल्या महिन्यापासून आतापर्यंत चार ते पाचवेळा पाईपलाइन फुटली आहे. एकीकडे डोंबिवली, कल्याण आणि दिवा शहरात लोकांना पाण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे तर दुसरीकडे जलवाहिन्या फुटण्याची सत्र सुरूच आहे. लाखो लिटर पाणी वाया जातं आहे.