मुख्यमंत्री शिवसेनेचा, पण मराठीसाठी काहीच नाही! रावतेंचा घरचा आहेर
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातला कालचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गदारोळामुळे चांगलाच गाजला. सचिन वाझे यांचं निलंबन करुन त्यांच्या अटकेची मागणी विरोधीपक्षाने लावून धरली होती. विरोधकांच्या या हल्ल्यापुढे महाविकास आघाडी सरकारची चांगली कोंडी झालेली पहायला मिळाली. एकीकडे विधानसभेत विरोधक सरकारला घेरत असताना विधान परिषदेत खुद्द शिवसेनेच्या आमदारांनीच मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे. […]
ADVERTISEMENT

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातला कालचा दिवस हा मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात गदारोळामुळे चांगलाच गाजला. सचिन वाझे यांचं निलंबन करुन त्यांच्या अटकेची मागणी विरोधीपक्षाने लावून धरली होती. विरोधकांच्या या हल्ल्यापुढे महाविकास आघाडी सरकारची चांगली कोंडी झालेली पहायला मिळाली. एकीकडे विधानसभेत विरोधक सरकारला घेरत असताना विधान परिषदेत खुद्द शिवसेनेच्या आमदारांनीच मराठी भाषेच्या मुद्द्यावरुन सरकारला घरचा आहेर दिला आहे.
अर्थसंकल्पात वापर होणाऱ्या इंग्रजी शब्दांवरुन दिवाकर रावतेंनी आपल्याच सरकारला कानपिचक्या दिल्या आहेत. “सभागृहात कामकाज सुरु असताना इंग्रजी शब्दांचा वापर चुकीचा आहे. मराठी शब्दसंग्रह असताना इंग्रजीचा वापर करणं हास्यास्पद आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री असतानाही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी एक शब्दही व्यक्त करण्यात आलेला नाही…याबद्दल मी खंत व्यक्त करतो. मी मेल्यावर साहेबांना भेटलो आणि वर गेल्यावर त्यांनी मला विचारलं की मराठी भाषेसाठी काय केलं तर मी काय उत्तर देऊ?” अशा शब्दांमध्ये रावतेंनी सरकारवर टीका केली आहे.
यावेळी बोलत असताना मराठी ही राजभाषा असून तिचा वापर प्रशासकीय कामकाजात व्हायला हवा. मुंबईत बॉम्बे क्लबचं नाव अजुनही बदललं जात नाही, तेच आहे. मुंबईत सर्व भाषा आणि परप्रांतीयांचे भवन आहेत पण मराठी भाषेचं भवन नाही. शिवसेनेला मराठीबद्दल एकही शब्द उच्चारता आला नाही हे दुर्दैव आहे, अशी संतप्त भावना आपल्या भाषणात दिवाकर रावतेंनी व्यक्त केली.