Monsoon News : पुढील ४८ तासात वाढणार वेग, जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होणार
मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी चांगली बातमी आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच ही चांगली बातमी आहे. पावसासाठी (Monsoon) अत्यंत पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात मान्सूनचा वेग वाढणार आहे. होसाळीकर यांनी काय म्हटलं आहे? नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य […]
ADVERTISEMENT

मान्सूनच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी चांगली बातमी आहे. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या सगळ्यांसाठीच ही चांगली बातमी आहे. पावसासाठी (Monsoon) अत्यंत पोषक वातावरण तयार झालं आहे. त्यामुळे पुढील ४८ तासात मान्सूनचा वेग वाढणार आहे.
होसाळीकर यांनी काय म्हटलं आहे?
नैऋत्य अरबी समुद्राचा काही भाग, आग्नेय अरबी समुद्राचा आणखी काही भाग, मालदीव आणि कोमोरिन क्षेत्र, दक्षिण आणि पूर्व-मध्य बंगालचा उपसागर आणि ईशान्य बंगालच्या उपसागराच्या काही भागात पुढील ४८ तासांत नैऋत्य मान्सूनच्या पुढील वाटचालीस अनुकूल परिस्थिती आहे.