Mumbai Third wave : मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात?; आकडेवारीतून स्पष्ट संकेत

मुंबई तक

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने घातलेलं थैमान आणि निर्बंधांचा फास आवळत असतानाच मंगळवारी समोर आलेली कोरोना रुग्णांची आकेडवारी मुंबईकरांना धडकी भरवणारी आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून, राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील तिसऱ्या लाटेचं संकट गडद झालं असून, आकडेवारी आणि तज्ज्ञांकडून असेच संकेत मिळत आहेत. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

जगभरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटने घातलेलं थैमान आणि निर्बंधांचा फास आवळत असतानाच मंगळवारी समोर आलेली कोरोना रुग्णांची आकेडवारी मुंबईकरांना धडकी भरवणारी आहे. मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाला असून, राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे मुंबईवरील तिसऱ्या लाटेचं संकट गडद झालं असून, आकडेवारी आणि तज्ज्ञांकडून असेच संकेत मिळत आहेत.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत कोरोनाने पुन्हा एकदा हातपाय पसरण्यास सुरूवात केली आहे. मुंबईत मंगळवारी (28 डिसेंबर) तब्बल 1,377 कोरोना संक्रमित रुग्ण आढळून आले. दीड ते दोन महिन्यानंतर सर्वाधिक रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरूवात झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.

Omicron संकटादरम्यान भारतात दोन नव्या लसींना मंजुरी, कोणत्या आहेत नव्या लसी?

आठवडाभरातील ट्रेंड काय?

हे वाचलं का?

    follow whatsapp