सरण पेटवताना तिघे होरपळले, दोघांचा मृत्यू; नागपुरातील घटना

नागपूरमधील कामठी परिसरातील घटना : अंत्यसंस्कारावेळी घडली घटना
two died during the cremation nagpur
two died during the cremation nagpur

-योगेश पांडे, नागपूर

राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये अंत्यसंस्कारावेळी घडलेल्या दुर्दैवी घटनेत दोघांचा मृत्यू झाला आहे. पार्थिवाला अग्नी देताना आगीचा भडका उडाल्याने ही घटना घडली.

अंत्यसंस्कारासाठी (सरण) चिता पेटवताना आगीची भडका झाल्याने अंत्ययात्रेत सहभागी झालेले तिघे जण भाजले. आगीच्या लोळांनी होरपळून तिघे गंभीर जखमी झाले होते. त्यापैकी दोघांचा रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटना नागपूर जिल्ह्यातील कामठी येथे घडली आहे.

दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे अशी या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्यांची नावं आहेत.

two died during the cremation nagpur
नागपुरमध्ये कुटुंब संपवण्यासाठी टोकाचं पाऊल! कारच दिली पेटवून, पत्नी आणि मुलगा होरपळले

नागपूरमध्ये नेमकं काय घडलं?

नागपूरमधील कामठी येथील रहिवाशी सिद्धार्थ अंतुजी हुमने यांचा अपघाती मृत्यू झाला. सिद्धार्थ हुमने यांचा गुरुवारी संध्याकाळी कामठीतील राणी तलाव मोक्षधाम येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या पार्थिवावर राणी तलाव मोक्षधाम येथे अंत्यसंस्कार करण्यात येत होते.

सरणावर पार्थिव ठेवल्यानंतर अग्नी देताना डिझेलचा भडका उडाला. यामध्ये सुधीर महादेव डोंगरे, सुधाकर बुधाजी खोब्रागडे आणि दिलीप घनश्याम गजभिये हे तिघे भाजले गेले.

उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू

सरणाला आग लावताना उडालेल्या आगीच्या भडक्यात जखमी झालेल्या तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना नागपुरला हलविण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान दिलीप गजभिये आणि सुधीर डोंगरे या दोघांचा मृत्यू झाला.

two died during the cremation nagpur
नागपूर: गर्लफ्रेंडला घेऊन लॉजवर गेलेल्या तरुणाचा मृतदेहच सापडला; रूममध्ये काय घडलं?

कारच दिली पेटवून, कुटुंबच झालं उद्ध्वस्त

गेल्याच आठवड्यात नागपूरमध्ये एक भयंकर घटना घडली होती. 65 वर्षीय रामराज भट्ट या व्यावसायिकाने पत्नी आणि मुलगा कारमध्ये बसलेले असताना कार पेटवून दिली. रामराज भट्ट यांनी पत्नी आणि मुलाला हॉटेलमध्ये जेवणासाठी जाऊ म्हणून तयार केलं.

वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये त्यांनी जेवण केलं. जेवण करून आपल्या कारमधून घरी परतत होते. जवळपास दुपारी एकच्या सुमारास गाडी खापरी पुनर्वसन केंद्राजवळ थांबवली. अचानक रामराज यांनी आपल्या जवळील असलेला ज्वलनशील पदार्थ कारवर शिंपडला. त्यानंतर आपल्यासह पत्नी आणि मुलाच्या अंगावर देखील शिंपडलं. पत्नी आणि मुलाला काही कळायच्या आत कार पेटवून दिली.

two died during the cremation nagpur
नागपुरातील संतापजनक घटना! पोलीस उपनिरीक्षकाचा अल्पवयीन मुलींवर बलात्कार

आगीचा भडका उडताच रामराज यांची पत्नी आणि मुलगा पेटलेल्या अवस्थेत कारमधून बाहेर पडले. रस्त्यावर पावसामुळे साचलेल्या पाण्यात लोळून त्यांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. यात दोघेही गंभीर जखमी झाले होते, तर रामराज यांचा आगीत होरपळून जागीच मृत्यू झाला होता. संगीता आणि नंदन यांना घटनास्थळी असलेल्या नागरिकांनी रुग्णालयात दाखल केलं, मात्र उपचारादरम्यान दोघांचाही मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in