Navneet Rana, Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांनी जामीन न घेण्याची भूमिका का बदलली?
हनुमान चालीसा पठण प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांना वांद्रे येथील सुट्टीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने ६ मे पर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने सुरुवातीलाच जामिनासाठी अर्ज करणार नसल्याची भूमिका घेतली होती, मात्र आज भूमिका बदल जामीन अर्ज दाखल केला आहे. मुख्यमंत्री […]
ADVERTISEMENT

हनुमान चालीसा पठण प्रकरणात मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांना वांद्रे येथील सुट्टीच्या न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. न्यायालयाने ६ मे पर्यंत म्हणजेच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दरम्यान, राणा दाम्पत्याने सुरुवातीलाच जामिनासाठी अर्ज करणार नसल्याची भूमिका घेतली होती, मात्र आज भूमिका बदल जामीन अर्ज दाखल केला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचं खासदार नवनीत राणा आणि रवि राणा यांनी म्हटलं होतं. त्यासाठी ते शुक्रवारी मुंबईत आले. मात्र, शिवसैनिकांच्या तीव्र विरोधामुळे त्यांना मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठण करता आलं नाही. दरम्यान, त्यांच्याविरुद्ध भादंवि कलम १५३ अ खाली गुन्हा दाखल करत पोलिसांनी अटक केली.
Navneet Rana Ravi Rana : नवनीत राणा, रवि राणांना न्यायालयीन कोठडी; न्यायालयात काय घडलं?
या अटकेनंतर त्यांच्यावर सरकारी कामात हस्तक्षेप केल्याप्रकरणीही गुन्हा दाखल केला होता. राणा दाम्पत्याला आज सकाळी खार पोलिसांनी वांद्रे येथील सु्ट्टी कालीन न्यायालयासमोर हजर केलं. यावेळी रिझवान मर्चंट यांनी नवनीत राणा आणि रवि राणा यांच्या बाजूने युक्तिवाद केला. तर प्रदीप घरत यांनी सरकारच्या बाजू मांडली.