राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलर्ससोबत संबंध आहेत हे नवाब मलिक यांनीच मान्य केलं-मोहित कंबोज

मोहित कंबोज यांचं नवाब मलिकांच्या आरोपांना उत्तर
राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे ड्रग्ज पेडलर्ससोबत संबंध आहेत हे नवाब मलिक यांनीच मान्य केलं-मोहित कंबोज

सर्वात आधी मी नवाब मलिक यांचे आभार मानतो कारण मी काल जे काही बोललो ते सगळं त्यांनी मान्य केलं. मी एक महिन्यापासून काही गोष्टी समोर ठेवत होतो, आज महाराष्ट्राच्या समोर वास्तव आलं आहे. त्यांनी क्रूझ पार्टीपासून दाढीवाल्या माणसाचा उल्लेख केला होता. आज त्यांनी स्वतःच त्या दाढीवाल्याचं नाव अस्लम शेख यांच्यासोबत जोडून खुलासा केला. त्यांनी हे सांगितलं की दाढीवाला अस्लम शेख यांना पार्टीत बोलवत होता. त्यांचा रोख काशिफ खानकडे होता. मला हे जाणून घ्यायचं आहे अस्लम शेख आणि काशिफ खान यांचे काय असे संबंध आहेत की तो अस्लम शेख यांना पार्टीत येण्यासाठी विनवत होता. असा प्रश्न विचारत मोहित कंबोज यांनी आज नवाब मलिकांच्या आऱोपांना उत्तर दिलं आहे.

माझा आरोप हा होता की मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांचा या पार्टीशी संबंध होता ती बाब आज नवाब मलिक यांनी स्वतः मीडियासमोर ठेवली. मी हे सांगितलं होतं की राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांचा समावेश या पार्टीत होता. काशिफ खान यांच्याशी त्यांचे संबंध होते. आज नवाब मलिक यांनी हेपण मान्य केलं की ड्रग्ज पेडलरसोबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या मुलांचे संबंध आहेत असाही आरोप मोहीत कंबोज याने केला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मुलांचे ड्रग्ज माफियांशी संबंध आहेत हे नवाब मलिकांनी मान्य केलं.

सुनील पाटीलसोबत संबंध नाकारले असले तरीही सुनील पाटीलने फोन केले होते हे त्यांनी मान्य केलं आहे. नवाब मलिक यांनी सुनील पाटील सोबत मिळून भाजप विरोधात कटर चला आहे. नवाब मलिक यांनी रोज नवे आरोप करत आहेत. मात्र चिंकू पठाण कोण आहे याचं उत्तर कुणी दिलं का? चिंकू पठाण आणि समीर खानचा काय संबंध आहे यावर नवाब मलिकांनी उत्तर द्यावं. तीन हजार कोटींची जी संपत्ती नवाब मलिकांनी कोणतं भंगार विकून बनवली असाही आरोप मोहित कंबोज यांनी विचारला आहे. नवाब मलिक यांनी शेतकरी असल्याचं दाखवून जागा खरेदी केली आहे. एक हजार कोटींचा प्रकल्प जुहू मध्ये सुरू आहे. एवढी सगळी मालमत्ता त्यांनी कशी बनवली आहे. मला जर एनसीबीचे प्रवक्ते समजत असाल तर ते साफ चुकीचे आहेत.

मी जर सगळा कट रचला तर मग एक महिना नवाब मलिक झोपले होते ? हॉटेल ललितमध्ये कबाब, शबाब आणि नवाब असायचे असाही प्रश्न मोहित कंबोज यांनी विचारला आहे. तुमच्याकडे जर सगळे पुरावे आहेत तर सांगा ड्रग्ज पेडलर्स आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांच्या मुलांचं नेमकं काय कनेक्शन आहे ते सांगावं. माझ्यावर आरोप करून काही होणार नाही. माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून सुरू आहे. मात्र मी गप्प बसणार नाही, घाबरणार नाही. तुम्हाला जी चौकशी करायची आहे ती करू शकता असंही आव्हान कंबोज यांनी केलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in