Nawab Malik: 'ये क्या किया तुने समीर वानखेडे?', नवाब मलिकांनी मध्यरात्रीच शेअर केला नवा फोटो
nawab malik new tweet photo nikahnama sameer wankhede muslim costume wedding ncb(फोटो सौजन्य: Nawab Malik/Twitter)

Nawab Malik: 'ये क्या किया तुने समीर वानखेडे?', नवाब मलिकांनी मध्यरात्रीच शेअर केला नवा फोटो

Nawab Malik Tweet nikahnama photo Sameer Wankhede: नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या पहिल्या लग्नाचा आणखी एक फोटो शेअर केला आहे.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी अंमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे (NCB) मुंबई विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्याविरोधात गेल्या काही महिन्यांपासून आघाडी उघडली आहे. समीर वानखेडे हे मूळ मुस्लिम असून त्यांनी धर्म परिवर्तन करुन नोकरी मिळवला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. याच दरम्यान, नवाब मलिक यांनी मध्यरात्री समीर वानखेडे यांचा आणखी एक फोटो आपल्या ट्विटरवर शेअर केला आहे. ज्यावरुन त्यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडेंवर हल्लाबोल केला आहे.

महाराष्ट्र सरकारचे मंत्री नवाब मलिक यांनी मध्यरात्री आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावरुन एक फोटो ट्विट केला आहे. नवाब मलिक यांनी फोटो ट्विट करताना कॅप्शनमध्ये असं म्हटलं आहे की, 'कबूल है, कबूल है, कबूल है... याच ट्विटमध्ये त्यांनी पुढे असं लिहिलं आहे की, 'समीर दाऊद वानखेडे तुम्ही हे काय केलं?'

नवाब मलिक यांनी ट्विट केलेल्या या फोटोमध्ये टोपी घातलेला एक व्यक्ती (नवाब मलिक यांचा मते ही व्यक्ती समीर वानखेडे आहे.) एका कागदावर सही करताना दिसत आहे. हा 'निकाहनामा' असल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या मानहानीच्या याचिकेवर आज (22 नोव्हेंबर) सुनावणी होणार आहे. याच दिवशी नवाब मलिक यांनी निकाहनाम्यावर सही करतानाचा फोटो शेअर केला आहे.

समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवाब मलिक यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात अब्रू नुकसानाची याचिका दाखल करून सव्वा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मागितली आहे. समीर वानखेडे यांच्या वडिलांनीही नवाब मलिक यांना त्यांच्या कुटुंबाविरोधात सोशल मीडियावर अवमानकारक वक्तव्य करण्यापासून रोखावे, अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. मुंबई उच्च न्यायालय आज या प्रकरणी निकाल देऊ शकतं.

nawab malik new tweet photo nikahnama sameer wankhede muslim costume wedding ncb
समीर वानखेडेंच्या विरोधात बॉम्बे हायकोर्टात याचिका, सेवेतून बरखास्त करण्याची मागणी

नवाब मलिक यांनी समीर वानखेडेवर मुस्लिम असल्याचा दावा केला होता. तसंच समीर वानखेडेंनी स्वत:ला अनुसूचित जातीचे असल्याचे सांगून बनावट प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी मिळवल्याचा आरोप केला होता. नवाब मलिक यांच्या पथकाने मुंबई उच्च न्यायालयाला पुरावा म्हणून समीर वानखेडेचा शाळा प्रवेश अर्ज आणि प्राथमिक स्तरावरील शाळेचे प्रमाणपत्र दिले होते.

नवाब मलिक यांच्या टीमने समीर वानखेडे याने स्वत:च्या बचावासाठी बनावट प्रमाणपत्रे बनवल्याचा दावाही केला आहे. समीर वानखेडे यांच्या कायदेशीर पथकाने समीर वानखेडे यांचा जन्म दाखला न्यायालयात सादर केला. त्यात त्यांचे नाव समीर ज्ञानदेव वानखेडे असे नोंदवले आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in