समीर वानखेडे अडचणीत?; नवाब मलिकांनी बोगस जातप्रमाणपत्राबद्दल केला मोठा खुलासा
राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहे. समीर वानखेडे यांनी जन्मदाखल्यात केलेली छेडछाड केल्याचा आरोप करत त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं मलिक म्हणाले. मलिक यांनी यासंदर्भातील घटनाक्रम विशद केला. नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत काही कागदपत्र दाखवत आणखी काही खुलासे केले. […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले आहे. समीर वानखेडे यांनी जन्मदाखल्यात केलेली छेडछाड केल्याचा आरोप करत त्यांनी बोगस कागदपत्राच्या आधारे जात प्रमाणपत्र मिळवलं असल्याचं मलिक म्हणाले. मलिक यांनी यासंदर्भातील घटनाक्रम विशद केला.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत काही कागदपत्र दाखवत आणखी काही खुलासे केले. समीर वानखेडे सरकारी नोकरीत असतानाही व्यवसाय करत असल्याचा दावा मलिकांनी केला असून, अल्पवयीन असतानाच त्यांच्या नावे बार लायसन्स काढण्यात आलं होतं, असा गौप्यस्फोट मलिकांनी केला.
नवाब मलिक काय म्हणाले?
“समीर दाऊद वानखेडे यांचा जन्मदाखला आम्ही ट्विटरवर टाकला होता. त्यावर इथूनच फसवेगिरी सुरू झाल्याचं म्हटलं होतं. याविरोधात समीर वानखेडे यांचे वडील न्यायालयात गेले. माझ्या बोलण्यावर बंधन आणून ट्वीट डिलीट करण्याची मागणी केली गेली. आम्ही न्यायालयात कागदपत्रं दाखल केली आहे. सोमवारी न्यायालय निकाल देणार आहे.”