नवाब मलिकांच्या आरोपांना NCB चं उत्तर, म्हणाले 'ते दोघे तर...'

NCB Press conference answer to Nawab Malik: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबीवर जे आरोप केले त्या आरोपाला आता एनसीबीकडून उत्तर देण्यात आलं आहे.
नवाब मलिकांच्या आरोपांना NCB चं उत्तर, म्हणाले 'ते दोघे तर...'
ncb press confrence answer to nawab malik on kp gosavi and manish bhanushali mumbai drug case aryan khan sameer wankhede

मुंबई: नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB)केलेली कारवाई ही पूर्णपणे बनावट आहे. असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन केला. तसेच भाजपचा कार्यकर्ता आरोपींना घेऊन थेट NCB कार्यालयात कसा घुसला? असा सवालही मलिकांनी केला होता. ज्याला आता एनसीबीने देखील पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिलं आहे.

'आमच्या संस्थेवर काही आरोप लावण्यात आले आहेत. मी सांगू इच्छितो के ते बिनबुडाचे आहेत. सर्व प्रक्रिया पार पाडून आणि नियम पाळूनच ही कारवाई केली आहे.' असं एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, आर्यन खान आणि अरबाज मर्चंट यांना खेचून एनसीबी कार्यालयात आणणारे दोघे जण कोण आहेत याबाबत थेट काहीही न बोलता एनसीबी अधिकाऱ्यांनी फक्त एवढंच सांगितलं की, 'सर्व पंचनामे हे कायद्यातील नियमानुसारच बनविण्यात आले आहेत. कायद्यात असा नियम आहे की, स्वतंत्र साक्षीदाराला सामील करता येतं. तर यावेळी ज्या स्वतंत्र साक्षीदारांचा समावेश करण्यात आला त्यांची नावं अशी, किरण गोसावी, मनिष भानुशाली, अबरेज गोमेज, आदिल उस्मानी अशी आहेत.'

म्हणजेच नवाब मलिक यांनी ज्या केपी गोसावी आणि मनिष भानुशाली यांच्याबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्याला उत्तर देताना एनसीबीने स्पष्ट केलं की, हे दोघेही स्वतंत्र साक्षीदार आहेत.

पाहा एनसीबीने नेमकं काय म्हटलं आहे

'एनसीबीच्या मुंबई शाखेने क्रूझ आंतरराष्ट्रीय टर्मिनलच्या ग्रीन गेटवरील कॉर्डिला क्रूझ शीपवर छापा मारला आणि आठ लोकांना ताब्यात घेतलं. ज्यांची नावं याप्रमाणे आहेत, विक्रम चोकर, ईश्मीनसिंह चढ्ढा, अरबाज मर्चंट, आर्यन खान, मोहक जयस्वाल, मुनमुन धमेचा आणि नुपूर सजिता. हे सर्व जण स्पॉटवरच पकडण्यात आले. यांच्याकडे खूप सारे ड्रग्स जसं की, कोकेन, चरस, मेफेड्रॉन, हायड्रोपॉनिक व्ही, एमडीएम याच्यासह 1 लाख 33 रुपयांची रोकड सापडली.'

'प्राथमिक चौकशीनुसार, मोहक जयस्वालची जेव्हा चौकशी करण्यात आली तेव्हा त्याने दिलेल्या जबाबानुसार जोगेश्वरीत एक छापा मारण्यात आला. ज्यामध्ये अब्दुल कादिर शेख नावाच्या व्यक्तीला कमर्शियल कॉन्टेटीच्या ड्रग्ससह 3 ऑक्टोबरला अटक करण्यात आली. तसेच इश्मित चढ्ढाच्या जबाबानुसार, गोरेगावमध्ये एनसीबी टीमने श्रेयस सुंदर नायर याला चरससोबत अटक केली. आणखी एका ऑपरेशनमध्ये मनिषराज गढिया जो की शिपवर एक 'गेस्ट' म्हणून होता त्याला देखील ड्रग्ससह अटक करण्यात आली आहे.'

'इव्हेंट मॅनेजमेंटच्या चार जणांना गोपालजी आनंद, समीर सेहगल, मानव सेहगल, भास्कर अरोरा या सगळ्यांना पुराव्याच्या आधारे अटक करण्यात आली आहे. तसेच अजित कुमार याला देखील ड्रग्ससह अटक करण्यात आली आहे.'

'सर्व पंचनामे हे कायद्यातील नियमानुसारच तयार करण्यात आले आहेत. कायद्यात असा नियम आहे की, स्वतंत्र साक्षीदाराला सामील करण्याचा. तर यावेळी ज्या स्वतंत्र साक्षीदारांचा समावेश करण्यात आला आहे त्यांची नावं अशी, प्रभाकर सेहल, किरण गोसावी, मनिष भानुशाली, अबरेज गोमेज, आदिल उस्मानी, व्ही वैयंगणकर, प्रकाश बहादूर, मुज्मील इब्राबहिम अशी आहेत.'

ncb press confrence answer to nawab malik on kp gosavi and manish bhanushali mumbai drug case aryan khan sameer wankhede
Mumbai Drug Case: नवाब मलिकांनी ड्रग्स केस प्रकरणात NCB वर केले 5 गंभीर आरोप

'आतापर्यंतच्या कारवाईत क्रूझवर सापडलेल्या ड्रग्सनंतर चार आणखी ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. जे नियमानुसार आहे. या केसचा तपास अद्याप सुरु आहे.'

'आमच्या संस्थेवर काही आरोप लावण्यात आले आहेत. मी सांगू इच्छितो की, ते बिनबुडाचे आहेत. सर्व प्रक्रिया पार पाडून आणि नियम पाळूनच ही कारवाई केली आहे. जर तपासाबाबत कोणाला काही शंका असेल तर त्यांनी याप्रकरणी कोर्टात जावं आम्ही त्याला कोर्टात उत्तर देऊ.' असं एनसीबी अधिकाऱ्यांनी यावेळी म्हटलं आहे.

Related Stories

No stories found.