सहकाऱ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली-शरद पवार

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

सहकाऱ्यांच्या कष्टांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली असं म्हणत आपल्या सगळ्या सहकाऱ्यांचं कौतुक केलं. 22 वर्षांपूर्वी आपण एक निर्णय घेतला. त्या निर्णयासोबत आपला सामान्य माणूस होता. राष्ट्रवादी काँग्रेसने 22 वर्षे पूर्ण केली आहेत. त्या निमित्त वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. आज घडीला शिवसेना आणि आपण एकत्र येऊन काम करतो आहे. हे सरकार येईल असं कुणाला वाटलंही नव्हतं पण आपण महाविकास आघाडी स्थापन केली आणि आपलं सरकार चांगलं काम करत आहे. मला या सरकारच्या भवितव्याची चिंता वाटत नाही. कारण महाविकास आघाडी लोकांनी स्वीकारली आहे.

परवा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची वैयक्तिक भेट झाली. त्यानंतर लगेच विविध चर्चा सुरू झाल्या. त्या चर्चांना काही अर्थ मला वाटत नाही असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे. देशावर कोरोनासारखं संकट आलं तेव्हा परिस्थिती गंभीर होती. महाराष्ट्रातही परिस्थिती गंभीर होती. मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही ही परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली. महाराष्ट्र आपल्यासोबतच शिवसेनेलाही अनेक वर्षे ओळखतो आहे. त्यामुळेच महाविकास आघाडीला सगळ्य जनतेने स्वीकारलं आहे हे महत्त्वाचं आहे.

आपलं सरकार पाच वर्षे चांगलं काम करणार आहे यात माझ्या मनात शंका नाही. देशात अनेक पक्ष आले आणि गेले.. अनेक लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही सोडला. मात्र आपण सगळ्या सहकाऱ्यांच्या साथीने आपण इथवर आलो आहोत. आपण आपला पक्ष चांगल्या रितीने सांभाळला आणि मोठा केला. एक काळ असा होता की इंदिरा गांधींना पाठिंबा देण्यासाठी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. इंदिरा गांधी यांना बाळासाहेबांनी शब्द दिला होता तो त्यांनी तंतोतंत पाळला. त्यामुळे कुणी काहीही म्हणूदे आपल्या सरकारच्या कितीही मुदती देऊ द्या आपल्या सरकारबाबत काहीही चिंता वाटत नाही.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

आज मराठा आरक्षणाचा मुद्दाही राज्यात गाजतो आहे. ओबीसींच्या राजकीय आरक्षणाचा विषय असेल हे सगळे प्रश्न महत्त्वाचे आहेत आणि ते आपल्याला सोडवावेच लागतील. सत्ता एककेंद्री झाली की ती भ्रष्ट झाली पाहिजे त्यामुळे ती अधिक लोकांच्या हाती गेली पाहिजे. SC, OBC यांच्यातील प्रत्येक घटकाला मी सत्तेचा वाटेकरी आहे ही जाणीव वाटली पाहिजे. हे झालं तरच आपल्याला लोकांचा पाठिंबा जास्त प्रमाणावर मिळेल असंही शरद पवार यांनी स्पष्ट केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT