पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

मुंबई तक

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा समीर गायकवाडवर भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर गायकवाड हा मुंढवा परिसरातील महिलेकडे भाजी घेण्यासाठी जात असायचा, यातून त्यांची ओळख […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
google news

पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगरसेवक बंडू गायकवाड यांचा मुलगा समीर गायकवाडवर भाजी विक्रेत्या महिलेवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेनंतर पुण्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी समीर गायकवाड हा मुंढवा परिसरातील महिलेकडे भाजी घेण्यासाठी जात असायचा, यातून त्यांची ओळख झाली. त्याच दरम्यान साधारणपणे दीड वर्षांपूर्वी पीडित महिला घरी एकटी असताना, आरोपी समीर याने महिलेवर अत्याचार केल्याची घटना घडली. या बाबत, जर तू कोणाला याबद्दल सांगितलंस तर तुझ्या नवर्‍याला आणि मुलांना मारून टाकेन अशीही धमकी समीरने दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे.

आपल्या परिवाराच्या भीतीमुळे पीडित महिलेने घडलेल्या प्रकाराबद्दल कोणालाही सांगितलं नाही. यानंतर १७ डिसेंबरला पीडित महिलेच्या घरात आरोपी समीर तिच्यावर अत्याचार करत असताना महिलेच्या पती आणि मुलाने हा प्रकार पाहिला. यावेळीही समीरने महिलेच्या पती आणि मुलाला जिवे मारण्याची धमकी दिली. यानंतर पीडित महिलेने आपल्या पतीच्या सहाय्याने समीर गायकवाडविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

खिशाला लावलेल्या बॉलपेनमुळे बिंग फुटलं, घरफोडी करणारे आरोपी पुणे पोलिसांच्या जाळ्यात

हे वाचलं का?