Lt Nitika Kaul: सैन्यात अधिकारी बनली शहीद मेजरची पत्नी, पुलवामा चकमकीत पतीने गमावलेले प्राण

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुलवामा येथे 2019 साली झालेल्या दहशवादी हल्ल्यात मेजर विभूती शंकर धोंडीयाल हे शहीद झाले होते. मात्र, आता त्यांच्या पत्नी नितिका धोंडीयाल या भारतीय सैन्यात दाखल झाल्या आहेत. देशसेवेसाठी सैन्यात दाखल झालेल्या नितिका यांनी प्रथमच सैन्याचा गणवेश घातला होता. यावेळी नितिका यांनी त्यांच्या पतीला श्रद्धांजलीही अर्पण केली.

पुलवामा येथे जैश-ए-मुहम्मद या दहशतवादी संघटनेच्या हल्ल्यात नितिका यांचे पती शहीद झाले होते. अशावेळी पतीच्या पावलावर पाऊल ठेवून आपण देखील सैन्यात दाखल व्हावं असं नितिका यांना वाटत होतं आणि त्यामुळेच त्यांनी गेले दोन वर्ष यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. अखेर काल (29 मे) त्या लष्करात भरती झाल्या. यावेळी लेफ्टनंट जनरल वाय.के. जोशी यांनी स्वत:च्या हातांनी नितिका यांच्या खांद्यावर स्टार लावले. त्यामुळे नितिका या आता अधिकारी बनून सैन्यात दाखल झाल्या आहेत.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथसिंग रावत यांनीही ट्विट करुन नितिका यांचे अभिनंदन केले आहे. नितिकान यांनी आपली कॉर्पोरेट जगतातील नोकरी सोडून सैन्यात जाण्याचा मार्ग स्वीकारला. खरं तर त्यांनी आपल्या शहीद पतीला श्रद्धांजली वाहण्यासाठी लष्करात दाखल होण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पतीच्या निधनानंतर सहा महिन्यानंतर नितिकाने शॉर्ट सर्व्हिस कमिशन (SSC) परीक्षा आणि सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) मुलाखत उत्तीर्ण केली. त्यानंतर त्यांचे चेन्नई येथील ऑफिसर्स ट्रेनिंग अॅकॅडमी (OTA) येथे प्रशिक्षण घेण्यात आले. 2019 मध्ये एका मुलाखती दरम्यान नितिका यांनी सहानुभूती व्यक्त करण्याऐवजी लोकांना ऐक्य आणि सामर्थ्याने उभे राहण्याचे आवाहन केले होते.

MiG-21 Crash: लढाऊ विमान मिग-21 क्रॅश, पायलट अभिनव शहीद; नुकतंच झालं होत लग्न

ADVERTISEMENT

पुलवामा येथे जैशच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे चार जण शहीद झाले होते. या चार जवानांमध्ये मूळचे देहरादूनचे असलेले मेजर धोंडीयाल यांचाही समावेश होता. डेहराडून येथील रहिवासी मेजर धुंडियाल हे होते. या चकमकीत 14 फेब्रुवारी रोजी पुलवामा हल्ल्याचा मुख्य सूत्रधार आणि जैशचा कमांडर कामरानला ठार करण्यात आले होते.

ADVERTISEMENT

आपले मेजर पती आणि इतर शहिदांची प्रशंसा करताना नितिका म्हणाल्या होत्या की, ‘मला अभिमान आहे. आम्ही सर्व तुमच्यावर निस्सिम प्रेम करतो. आपण लोकांवर ज्या प्रकारे प्रेम करतात तो मार्ग पूर्णपणे भिन्न आहे. आपण लोकांसाठी आपला स्वत:चा जीव दिला. ते देखील अशा लोकांसाठी ज्यांना आपण कधीही भेटला नाहीत. तुम्ही लोकांना आपलं जीवन दिलं.’

शहीद संदीप उन्नीकृष्णन यांच्यावर आधारित ‘मेजर’ सिनेमाबाबत मोठी घोषणा!

दरम्यान, नितिका यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर लष्करात अधिकारी पदापर्यंत मजल मारल्याने त्यांच्यावर सर्वच स्तरातून सध्या कौतुकाच वर्षाव होत आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT