बारामतीच्या व्हायरल झालेल्या रिक्षावाल्याला थेट सिनेमाची ऑफर
काही दिवसांपूर्वी वाजले की बारा या मराठी लावणीवर ठेका धरणारे बाबाजी कांबळे अगदी एका रात्रीत लोकांच्या परिचयाचे झाले. तर आता हेच बाबाजी कांबळे लवकरच तुम्हाला मराठी सिनेमामध्ये दिसणार आहेत. सोशल मीडियावर बाबाजी कांबळे यांच्या डान्सचा व्हिडीयो व्हायरल झाला आणि बघता बघता बाबाजी रातोरात फेमस झाले. यानंतर चक्क बारामतीत राहणारे आणि पेशाने रिक्षाचालक असणाऱ्या बाबाजी कांबळे […]
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी वाजले की बारा या मराठी लावणीवर ठेका धरणारे बाबाजी कांबळे अगदी एका रात्रीत लोकांच्या परिचयाचे झाले. तर आता हेच बाबाजी कांबळे लवकरच तुम्हाला मराठी सिनेमामध्ये दिसणार आहेत. सोशल मीडियावर बाबाजी कांबळे यांच्या डान्सचा व्हिडीयो व्हायरल झाला आणि बघता बघता बाबाजी रातोरात फेमस झाले. यानंतर चक्क बारामतीत राहणारे आणि पेशाने रिक्षाचालक असणाऱ्या बाबाजी कांबळे थेट ऑफर मिळाली ती चित्रपटाची.
बारामतीचा रिक्षावाला Viral Videoवर काय म्हणतो?
वाजले की बारा’ गाण्याने राज्यातील रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेलेल्या बारामती तालुक्यातील गुनवडी गावच्या बाबजी कांबळे यांना एक नव्हे तर २ मराठी चित्रपटाची ऑफर आली आहे. ‘चल रे फौजी’ आणि ‘कवच’ या आगामी दोन चित्रपटांमध्ये बाबजी कांबळे हे अभिनय करणार आहेत. चित्रपट-दिग्दर्शक घनशाम येडे यांनी बारामतीत येऊन बाबजी कांबळे यांची भेट घेऊन त्यांना चित्रपटाची ऑफर दिली.
मला जाऊ द्या ना घरी..बारामतीच्या रिक्षावाल्याचा डान्स पाहिलात का?
बाबाजी यांचा व्हिडिओ पाहून ‘अलख निरंजन’, ‘एलिजाबेथ एकादशी’ अशा काही चित्रपटांचे निर्माते, दिग्दर्शक असलेल्या घनश्याम येडे यांनी पाहिला आणि बाबजींना भेटण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार घनश्याम यांनी बारामतीत बाबजी कांबळे यांची भेट घेत कौतुक केलं.
घनश्याम येडे यांनी थेट आपल्या आगामी दोन चित्रपटात चांगल्या प्रकारची भूमिका घेण्याची इच्छा व्यक्त केली. या इच्छेने कांबळे हे भारावून गेले होते. येडे यांनी या रिक्षाचालकाला आपल्या आगामी चित्रपटांसाठी निश्चित केलं असून त्याबाबतचा करा देखील या दोघांमध्ये करण्यात आलाय.