पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एक वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू, भिवंडीतली घटना

मुंबई तक

पाण्यात भरलेल्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ही घटना घडली आहे. ज्यानंतर भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिलकैश अन्सारी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे. भिवंडी शहरातील देव नगर भागात ही घटना घडली आहे. कुटुंबातले सगळे सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी घरातला एक वर्षाचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

पाण्यात भरलेल्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. भिवंडीत ही घटना घडली आहे. ज्यानंतर भिवंडीतल्या भोईवाडा पोलीस ठाण्यात पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. दिलकैश अन्सारी असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे.

भिवंडी शहरातील देव नगर भागात ही घटना घडली आहे. कुटुंबातले सगळे सदस्य टीव्ही पाहण्यासाठी हॉलमध्ये बसले होते. त्यावेळी घरातला एक वर्षाचा चिमुकला खेळता खेळता बाथरुममध्ये गेला. बाथरुममध्ये पाण्याने भरलेली बादली होती त्यात तो पडला याच घटनेत त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी भिवंडीतील भोईवाडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दिलकैश हा भिवंडीतील देवनगर भागातील एका घरात कुटुंबासह राहत होता. घटनेच्या वेळी मृत चिमुकल्याची आई किचनमध्ये जेवण बनवत होती. तर त्यांची इतर मुले घरात हॉलमध्ये बसून टीव्ही बघत होती. त्यावेळी खेळता खेळता चिमुरडा बाथरूम मधील पाण्याने भरलेल्या बादलीत जाऊन पडला आणि त्यातच या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

दिलकैश अन्सारीला सहा भावंडं आहेत तो सगळ्यात लहान होता. मृत मुलाची आई शबाना अन्सारी (वय 29) यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणी पुढील तपास सुरू केला आहे. लहान मुलांकडे जास्त सजगतेने लक्ष देण्याची गरज आहे हेच ही घटना अधोरेखीत करते आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp