Pegasus-Farmer Bill वरून राज्यसभेत विरोधकांचा राडा आणि फाईलफेक, लाज आणली म्हणत भाजपची टीका

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पेगासस स्पायवेअर आणि शेतकरी कायद्यांवर चर्चेपासून सरकार पळ काढतं आहे असं म्हणत राज्यसभेत विरोधकांनी तुफान राडा घातला. एका खासदाराने टेबलवर चढून फाईलही अध्यक्षांच्या दिशेने भिरकावली. हे सरकार ब्लफ सरकार आहे म्हणजेच फसवणूक करणारं सरकार आहे असं म्हणत हा राडा घालण्यात आला. तृणमूलचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी यासंदर्भातलं ट्विट करून सरकारवर टीका केली आहे.

काय म्हणालेत डेरेक ओ ब्रायन?

सप्टेंबर 2020 ची पुनरावृत्ती आज राज्यसभेत पाहण्यास मिळाली. सगळ्या विरोधकांचं हेच म्हणणं आहे की मोदी सरकार म्हणजे फसवणूक करणारं सरकार आहे. रस्त्यावर शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे आणि सभागृहात विरोधी बाकांवरच्या खासदारांचा. पण तरीही मोदी सरकार पेगासस आणि शेतकरी कायदे या दोन्ही मुद्द्यांवर पळ काढतं आहे. सरकार कसं पळपुटं आहे आणि त्यांचा निषेध कशा प्रकारे केला जातो आहे हे सांगण्यासाठी डेरेक यांनी एक व्हीडिओही ट्विट केला आहे. यामध्ये विरोधी बाकांवरचे खासदार अध्यक्षांच्या खुर्चीसमोर आले आहेत. वेलमधे उतरून राडा घालताना दिसत आहेत. सरकारविरोधी घोषणाही देत आहेत.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

विरोधकांनी लाज आणली

दुसरीकडे विरोधकांनी आपल्या संसदेच्या मंदिरात आज लाज आणली असं ट्विट भाजप खासदार तेजस्वी सूर्या यांनी केलं आहे. विरोधकांचं असंसदीय वर्तन आज सभागृहात पाहण्यास मिळालं. सर्वात जुना पक्ष असलेल्या काँग्रेसकडून हे वर्तन अपेक्षित नाही. प्रताप सिंग बाजवा या काँग्रेस खासदाराने तर हद्दच केली राज्यसभेचे पीठासीन अध्यक्ष जिथे बसतात त्या खुर्चीवर फाईल फेकून मारली. त्यासाठी त्यांचे सहकारी त्यांना साथ देत आहेत. हा लोकशाहीच्या मंदिराचा अपमान आहे. लाज आणली या आशयाचं ट्विट तेजस्वी सूर्या यांनी केलं आहे.

ADVERTISEMENT

Pegasus ची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात होऊ लागली आहे. याबाबत आपण याआधी ऐकलं होतं ते 2019 मध्ये. त्यावेळी काही पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते य़ांना व्हॉट्स अॅपवर पेगासससंबंधी काही मेसेजस आले होते. आता सुब्रमण्यम स्वामींनी केलेल्या ट्विटमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. याबाबत चर्चा करण्याची मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. अशात सरकारने याबाबत चर्चा नाकारली असल्याने विरोधक आक्रमक झाले आहेत.

ADVERTISEMENT

दुसरीकडे शेतकरी आंदोलन डिसेंबर महिन्यापासून चिघळलं आहे. या आंदोलकर्त्या शेतकऱ्यांची ही मागणी आहे की जाचक असणारे कृषी कायदे रद्द करा. पंजाब आणि हरयाणा या दोन राज्यांमधले शेतकरी भर थंडीपासून आता थेट पावसाळ्यापर्यंत आंदोलन करत आहेत. सरकारसोबत झालेल्या चर्चेच्या सगळ्या फेऱ्या निष्फळ ठरल्या आहेत. अशा सगळ्या वातावरणात कृषी कायद्यांबाबत आणि या आंदोलनाबाबतही भाजपने ठंडा करके खाओ अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे शेतकरी आक्रमक तर झालेच आहेत. पण त्यांचा कैवार घेणारे नेतेही आक्रमक झाले आहेत. आज राज्यसभेत याच दोन मुद्द्यांवरून राडा झालेला पाहण्यास मिळाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT