संसदेचं पावसाळी अधिवेशन Pegasus वरून पेटणार! राहुल गांधी यांचा इशारा

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

संसदेचं पावसाळी अधिवेशन आजपासून सुरू होतं आहे. अशात पेगासस स्पायवेअरवरून पावसाळी अधिवेशन पेटणार हे आता जवळपास स्पष्ट झालं आहे. कारण काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरून ट्विट केलं आहे. We know what he’s been reading- everything on your phone! #Pegasus असं म्हणत राहुल गांधी यांनी ट्विट केलं आहे. पेगासस स्पायवेअरच्या मदतीने मोदी सरकारमधले मंत्री, खासदार, आरएसएसचे नेते या सगळ्यांच्या फोनचं टॅपिंग करण्यात आलं आहे.

रविवारी सुब्रमण्यम स्वामी यांनीच यासंदर्भात ट्विट केलं होतं. हा मुद्दा आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पेटण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांद्वारे लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांमध्ये या विषयावर चर्चेची मागणी केली जाणार आहे. राज्यसभेत सीपीआय नेते बिनॉय विश्वम, राजद खासदार मनोज झा, आपचे खासदार संजय सिंह यांच्यासह अनेक खासदारांनी या विषयावर चर्चेची मागणी केली आहे. राहुल गांधी यांनीही एका ओळीचं ट्विट करून मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. त्यामुळे संसदेचं पावसाळी अधिवेशन या मुद्द्यावरून पेटणार अशीच चिन्हं आहेत. आम्हाला ठाऊक आहे की ‘ते’ तुमच्या फोनमध्ये काय वाचत आहेत. या आशयाचं ट्विट करून राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काय आहे प्रकरण?

रविवारी काही देशांमधल्या मीडियाने याबाबत बातम्या दिल्या होत्या. यामध्ये असा दावा करण्यात आला होता की इस्रायली स्पायवेअर पेगाससच्या मदतीने मोदी सरकार हे त्यांनी ठरवलेल्या लोकांचं फोन टॅपिंग करतं आहे. त्यांची माहितीही मोदी सरकारने मिळवली आहे. या रिपोर्टमध्ये हा दावा करण्यात आला आहे की 300 फोन नंबर या सगळ्या टॅपिंग दरम्यान हॅक करण्यात आले आहेत. 2018 ते 2019 या वर्षभराच्या कालावधीत हे सगळं टॅपिंग करण्यात आलं आहे. यामधल्या पहिल्या टप्प्यात काही पत्रकार आणि न्यूज एजन्सीजची नावं समोर आली आहे.

ADVERTISEMENT

काय आहे Pegasus Spyware? ते कसं काम करतं आणि WhatsApp कसं हॅक करतं?

ADVERTISEMENT

दरम्यान केंद्र सरकारने हे सगळे दावे खोटे असल्याचं म्हटलं आहे. आंतरराष्ट्रीय मीडियामध्ये येणारे या बातम्या चुकीच्या आहेत. कोणत्याही प्रकारचं टॅपिंग किंवा काही करण्यात आलेलं नाही असं स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. भारत हा एक बळकट लोकशाही असलेला देश आहे. आपल्या देशातील सगळ्या नागरिकांचे मौलिक अधिकार आणि खासगीकरणाचा अधिकार अबाधित ठेवण्यासाठी कटिबद्ध आहे असंही केंद्र सरकारने म्हटलं आहे. मात्र या सगळ्यावरून संसदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT