आजार बरा करण्यासाठी महिलेकडे शारिरिक संबंधाची मागणी, गुप्तांगाचे फोटो पाठवणारा भोंदूबाबा अटकेत

मुंबई तक

– समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी पिंपरी-चिंचवड शहराच्या वाकड पोलिसांनी एका अशा ढोंगी साधुला अटक केली आहे जो लोकांना स्वतः अघोरी साधू असल्याचे भासवत जादू टोण्याच्या माध्यमातून त्यांचे सर्व आजार व पिडांपासून मुक्ती मिळवून देण्याचा दावा करत होता. या ढोंगी बाबाने अशाच पद्धतीने एका महिलेला रोग बरा करायचं आश्वासन देऊन आपल्या गुप्तांगाचे फोटो पाठवत शारिरिक संबंध […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

– समीर शेख, पिंपरी-चिंचवड प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड शहराच्या वाकड पोलिसांनी एका अशा ढोंगी साधुला अटक केली आहे जो लोकांना स्वतः अघोरी साधू असल्याचे भासवत जादू टोण्याच्या माध्यमातून त्यांचे सर्व आजार व पिडांपासून मुक्ती मिळवून देण्याचा दावा करत होता. या ढोंगी बाबाने अशाच पद्धतीने एका महिलेला रोग बरा करायचं आश्वासन देऊन आपल्या गुप्तांगाचे फोटो पाठवत शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी केली.

महिलेने या प्रकाराबद्दल वाकड पोलिसांत गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी भोंदू बाबा विलास पवारला अटक केली आहे.

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकाच्या मुलावर बलात्काराचा आरोप, गुन्हा दाखल

मिळालेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिलेशी संपर्क साधून सर्वात आधी आपण जादूटोणा आणि अघोरी विद्येच्या सहाय्याने सर्व आजार बरे करु शकतो असं भासवलं. यावेळी आरोपीने पीडित महिलेला तुमच्या पतीनेच मला तुमच्यावर जादूटोणा करायला सांगितल्याचं सांगितलं. यावेळी महिलेला उपचाराचा सल्ला देताना आरोपीने ज्या व्यक्तीच्या अंगावर किंवा गुप्तांगावर तीळ किंवा तिळाचे डाग आहेत त्याच्याशी शारिरिक संबंध ठेवण्यास सांगितलं. असं केल्यास तुम्हाला सर्व आजारातून मुक्ती मिळेल असं आश्वासन या भोंदूबाबाने दिलं.

सुरुवातीला पीडित महिलेने या बाबाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं. परंतू काहीवेळाने या बाबाने आपल्या गुप्तांगाचे फोटो घेत महिलेच्या मोबाईलवर पाठवत, तुम्हाला आजारापासून मुक्ती हवी असेल तर आपल्याशी शारिरिक संबंध ठेवावे लागतील असं सांगितलं. ज्यानंतर पीडित महिलेने थेट वाकड पोलीस ठाण्यात याविषयी तक्रार दाखल केली. वाकड पोलिसांनीही तात्काळ कारवाई करत या बाबाला बेड्या ठोकल्या आहेत.

पुणे : लाखोंची फसवणूक, तरुणीवर अनैसर्गिक अत्याचार; ‘ते’ व्हिडीओ व्हायरल करण्याची दिली धमकी

हे वाचलं का?

    follow whatsapp