माझ्या मुलाचं नाव ठेवा! आई वडिलांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी 10 सेकंदात केलं बारसं..

माझ्या मुलाचं नाव ठेवा! आई वडिलांच्या विनंतीनंतर राज ठाकरेंनी 10 सेकंदात केलं बारसं..

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर आहेत. येत्या महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने तयारी करायची म्हणून ते पुण्यात आले आहेत. रूपाली पाटील ठोंबरे यांनी कालच मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. अशात पक्षवाढीसाठी आणि तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यात आले आहेत. आज केसरीवाडा या ठिकाणी राज ठाकरे यांची कार्यकर्त्यांसोबत बैठक होती. ही बैठक संपल्यानंतर राज ठाकरे केसरीवाड्यातून खाली उतरत होते. त्यावेळी त्यांना एक जोडपं भेटलं.

या जोडप्याने राज ठाकरेंना आपल्या बाळाचं नाव ठेवण्याची विनंती केली. सुरूवातीला राज ठाकरे नाही म्हणाले. मात्र तरीही या जोडप्याने राज ठाकरेंना कळकळीची विनंती करणं सुरूच ठेवलं. ज्यानंतर राज ठाकरेंनी या मुलाच्या डोक्यावर हात ठेवत अवघ्या दहा सेकंदात या मुलाचं नाव यश असं ठेवलं. तिथे उपस्थित असलेल्या कॅमेरामन, पत्रकारांनी हा क्षण कॅमेरात टीपला. राज ठाकरेंनी या मुलाचं नाव यश ठेवलं त्याचं चांगलंच कौतुक होतं आहे.

ज्या आई वडिलांनी आपल्या बाळाचं नाव राज ठाकरेंना ठेवायला सांगितलं तो मनसेचा कार्यकर्ता आहे. राज ठाकरे आज केसरीवाड्यात आले तेव्हा त्यांनी आपल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीनंतर बाहेर पडत असताना या हा मनसेचा कार्यकर्ता आणि त्याची बायको या दोघांनी आपल्या बाळाचं नाव तुम्ही ठेवा अशी विनंती राज ठाकरेंना केली होती. सुरूवातीला राज यांनी नकार दिला. पण नंतर त्यांची विनंती ऐकून अवघ्या दहा सेकंदात या बाळाचं नाव यश असं ठेवलं आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in