Loksabha 2024 : राहुल गांधींसमोरच मल्लिकार्जुन खर्गेंनी सांगितलं काँग्रेसच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नाव

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

लोकसभा निवडणुकीला बराच अवकाश असला, तरी राजकीय पक्षांनी आतापासून तयारी सुरू केलीये. भाजपनं रणनीती आखलीये, तर काँग्रेसही नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंच्या नेतृत्वाखाली तयारीला लागल्याचं दिसत आहे. आता तर मल्लिकार्जून खरगेंनी काँग्रेसच्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतील पंतप्रधानपदाच्या उमेदवाराचं नावही जाहीर केलंय.

काँग्रेसनं राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारत जोडो यात्रा सुरू केलीये. कन्याकुमारीपासून सुरू झालेली भारत जोडो यात्रा वेगवेगळ्या राज्यांतून जात कश्मीरमध्ये संपणार आहे. याच यात्रेदरम्यान काँग्रेसचे नवे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगेंनी काँग्रेस २०२४ मध्ये विना भाजप सरकार स्थापन करेल, असं म्हटलंय.

हैदराबादमध्ये मल्लिकार्जून खरगेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे नेते राहुल गांधीही होते. मल्लिकार्जून खरगेंनी टीआरएसवर टीका केली. ते म्हणाले, ‘जेव्हा केव्हा आम्ही संसदेत एखाद्या विधेयकाला विरोधक करतो, ते (के चंद्रशेखर राव) भाजपला पाठिंबा देतात. आणि तेच म्हणतात की, आम्ही बिगर भाजप सरकार आणू. बिगर भाजप सरकार जर कुणी आणण्याची क्षमता आमच्यात आहे. काँग्रेस राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली बिगर भाजप सरकार आणेल. आमच्याकडे तितकी ताकद आहे’, असं खरगे म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

मल्लिकार्जून खरगे यांनी थेट राहुल गांधी हे काँग्रेसचे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील, असं म्हटलेलं नाही. मात्र, राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच बिगर भाजप सरकार स्थापन करू शकतं, असं म्हणत त्यांनी २०२४ मध्ये काँग्रेसचं सरकार राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काम करेल, असं स्पष्ट केलंय. त्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा राहुल गांधी विरुद्ध नरेंद्र मोदी असाच प्रचार बघायला मिळणार आहे.

के चंद्रशेखर राव आणि मोदींमध्ये काही फरक नाही -मल्लिकार्जून खरगे

मल्लिकार्जून खरगेंनी के चंद्रशेखर राव यांच्या टीका केलीये. ‘इथे केसीआर यांचं राज्य आहे. ही सत्ता कुठून आली. तेलंगानातल्या लोकांनी त्यांना दिलीये आणि आता ते तेलंगानातल्या लोकांना संपवण्याचा प्रयत्न करताहेत. कुणाची जमीन हिसकावून घेताहेत. कुणाला गप्प करण्याचा प्रयत्न करताहेत. कुणाला तुरुंगात डांबत आहेत. केसीआर आणि मोदींमध्ये काहीही फरक नाहीये’, असं मल्लिकार्जून खरगे म्हणाले.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT