कृषी कायद्याविरोधात पुण्यात रेल्वे रोको आंदोलन

मुंबई तक

पुणे: राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील 80 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि महाविकास आघाडीतील सर्व राजकीय नेत्यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस रेल्वे काही काळ रोखून ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. या रेल्वे रोको आंदोलनात […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

पुणे: राजधानी दिल्लीच्या सीमेवर मागील 80 दिवसांपासून शेतकरी कृषी कायद्याविरोधात आंदोलन करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पुण्यात शेतकरी बचाव संयुक्त कृती समिती आणि महाविकास आघाडीतील सर्व राजकीय नेत्यांनी पुणे रेल्वे स्टेशन येथे कोल्हापूर-मुंबई एक्स्प्रेस रेल्वे काही काळ रोखून ठेवत आंदोलन केले. तसेच यावेळी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली.

या रेल्वे रोको आंदोलनात काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष माजी मंत्री रमेश बागवे, शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह विविध संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

यावेळी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अभय छाजेड म्हणाले की, ‘केंद्राने शेतकर्‍यांच्या विरोधात तयार केलेला कृषी कायदा या विरोधात देशभरात शेतकरी आंदोलन करीत आहे. त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मागील 80 दिवसापासून शेतकरी ठिय्या मांडून आहे. तरी देखील केंद्र सरकार कायदे मागे घेत नाही. ही निषेधार्थ बाब असून आम्ही केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करतो. जोवर केंद्र सरकार कायदे मागे घेत नाही. तोवर आम्ही आंदोलन करीत राहणार. असा इशाराच त्यांनी यावेळी दिला आहे.

ही बातमी देखील पाहा: शेतकरी आंदोलनाचा भाजपला जोरदार झटका, पंजाबमध्ये काँग्रेसचे जय हो