हर्षद मेहताचा घोटाळा समोर आला आणि राकेश झुनझुनवालांनी कमालच केली
स्टॉक मार्केटचे बिगबुल मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. त्यांची वयाच्या 62 व्या वर्षी प्राणज्योत मालावली. त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून हजारो कोटी कमावले. 5 हजार रुपये गुंतवून राकेश झुनझुनवाला अब्जाधीश झाले. शेअर मार्केटमधील बहुचर्चित हर्षद मेहता याने केलेल्या घोटाळ्यादरम्यान 1992 साली त्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी […]
ADVERTISEMENT

स्टॉक मार्केटचे बिगबुल मानले जाणारे राकेश झुनझुनवाला यांचे दीर्घ आजाराने रविवारी निधन झाले. त्यांची वयाच्या 62 व्या वर्षी प्राणज्योत मालावली. त्यांनी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून हजारो कोटी कमावले. 5 हजार रुपये गुंतवून राकेश झुनझुनवाला अब्जाधीश झाले. शेअर मार्केटमधील बहुचर्चित हर्षद मेहता याने केलेल्या घोटाळ्यादरम्यान 1992 साली त्यांनी कोट्यवधी रुपये कमावल्याचे त्यांनी सांगितले. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी ही माहिती दिली होती.
हर्षद मेहता स्कॅमदरम्यान कमावले कोट्यवधी रुपये
नव्वदच्या दशकात हर्षद मेहतांच्या स्टॉक मार्केटमध्ये दबदबा होता. 1992 साली हर्षद मेहता घोटाळ्यादरम्यान झुनझुनवाला यांनी स्टॉक शॉर्ट करून खूप कमाई केली होती. ते बियर ग्रुपचे सदस्य होते आणि यादरम्यान त्यांना मोठा फायदा झाला होता. त्याकाळी बुल आणि बियर असे गट सक्रिय होते. बियर ग्रुपमध्ये झुनझुनवाला हे नाव प्रसिद्ध होते.
शेअर्स विकून कमावले पैसे