उद्धव ठाकरे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकले: रामदास आठवले

मुंबई तक

नांदेड दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. उद्धव ठाकरे सध्या मवाळ झाले असून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकल्याचं आठवले म्हणाले. २०१९ विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांची युती सत्तेत समान वाटपाच्या मुद्द्यावरुन तुटली. मध्यंतरी भाजपने अजित पवारांना हाताशी धरुन राज्यात सत्तास्थापनेचा प्रयोग […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

नांदेड दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेवर पुन्हा एकदा बोचऱ्या शब्दांमध्ये टीका केली आहे. उद्धव ठाकरे सध्या मवाळ झाले असून ते काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पिंजऱ्यात अडकल्याचं आठवले म्हणाले. २०१९ विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर शिवसेना आणि भाजप यांची युती सत्तेत समान वाटपाच्या मुद्द्यावरुन तुटली. मध्यंतरी भाजपने अजित पवारांना हाताशी धरुन राज्यात सत्तास्थापनेचा प्रयोग करुन पाहिला पण त्याला यश मिळालं नाही. यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांना सोबत घेऊन राज्यात सरकार स्थापन केलं.

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर रिपाइचे अध्यक्ष रामदास आठवले हे नेहमी त्यांना पुन्हा भाजपसोबत येण्याची ऑफर देत असतात. नांदेड मधील लोहा येथे पत्रकार परिषदेमध्ये बोलत असताना रामदास आठवले यांनी शिवसेना आता मवाळ झाल्याचं म्हटलंय. “उद्धव ठाकरे जर खरंच बाळासाहेबांचे वारसदार असतील तर ते परत येतील. बाळासाहेबांच्या स्वप्नातला शिवशक्तीचा आणि भीमशक्तीचा प्रयोग आता थांबला आहे त्यामुळे तो पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बॅक टू पॅव्हेलियन यावं. शिवसेनेचे भाजपसोबत जुने संबध आहेत. राज्यातील जनतेने शिवसेना-भाजप आणि रिपाइने एकत्र येऊन सत्ता स्थापन करावी असा आपल्याला कौल मिळाला होता”, अशा शब्दांमध्ये आठवले यांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली आहे.

उद्धव ठाकरे सध्या आमच्यापासून लांब गेलेत, पण त्यांनी पुन्हा आमच्यासोबत येण्यास काहीच हरकत नाही. ते सध्या शिवसेना आणि काँग्रेस यांच्यात चक्रव्यूहात अडकले आहेत, यामधून त्यांना बाहेर पडणं शक्य होणार नाही. पण यामधून त्यांना बाहेर काढण्याची आमची तयारी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधील वादांमुळे अनेकदा उद्धव ठाकरेंना मवाळ भूमिका घ्यावी लागत आहे. त्यामुळे या सरकारचं फारसं चांगलं भवितव्य नसल्याचंही आठवलेंनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp