Arpita Mukherjee: पश्चिम बंगालमध्ये ईडीची मोठी कारवाई, TMC मंत्र्याच्या निकटवर्तीयाच्या घरी छापा

मुंबई तक

West Bengal SSC Recruitment Scam पश्चिम बंगाल येथील शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा मारला आणि २० कोटींची रक्कम जप्त केली आहे. २ हजार रूपयांच्या नोटांचा खच लागलेले हे फोटो ईडीने ट्विट केले आहेत तसंच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
Google CTA

West Bengal SSC Recruitment Scam पश्चिम बंगा येथील शिक्षण भरती घोटाळ्यासंदर्भात ईडीने मोठी कारवाई केली आहे. शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी यांच्या निकटवर्तीय असलेल्या अर्पिता मुखर्जी यांच्या घरावर ईडीने छापा मारला आणि २० कोटींची रक्कम जप्त केली आहे. २ हजार रूपयांच्या नोटांचा खच लागलेले हे फोटो ईडीने ट्विट केले आहेत तसंच हे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही होत आहेत.

२० कोटींची रोकड पश्चिम बंगालच्या स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी संबंधित?

ईडीने जप्त केलेल्या या रक्कमेचा ढिगाराचा दिसतो आहे. ही रक्कम वेस्ट बंगाल स्कूल सर्व्हिस कमिशन घोटाळ्याशी संबंधित आहे असा संशय ईडीला आहे. ही रक्कम २० कोटींची असून त्यासह ईडीने २० मोबाईल, कागदपत्रं तसंच इलेक्ट्रॉनिक्स वस्तूही जप्त केल्या आहेत. शुक्रवारी पश्चिम बंगालमध्ये ईडीने अनेक ठिकाणी धाडी टाकल्या.

ईडीच्या एका अधिकाऱ्याने हे सांगितलं की शुक्रवारी ज्या ठिकाणी छापेमारी करण्यात आली त्यामध्ये शिक्षण मंत्री पार्थ चटर्जी, माजी शिक्षण मंत्री परेश अधिकारी, पश्चिम बंगाल प्रायमरी शिक्षण बोर्डाचे अध्यक्ष आणि आमदार मानिक भट्टाचार्य, पीके बंदोपाध्याय आणि सुकांता अचार्जी यांचा समावेश आहे. या कारवाईत ईडीने २० कोटींची रक्कम आणि २० मोबाईल जप्त केले आहेत.