Mohan Bhagwat: ”फक्त खाणं आणि लोकसंख्या वाढवणं, हे जनावरंही करतात”

मुंबई तक

संघ प्रमुख मोहन भागवत यांनी श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली होती. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. धर्मांतराचाही उल्लेख करण्यात केला आणि लोकसंख्येवरही मोठे विधान केले आहे. मोहन भगत यांनी स्पष्टपणे सांगितले की, केवळ जिवंत राहणे हे जीवनाचे ध्येय असू नये. मानवाची अनेक कर्तव्ये आहेत, जी त्यांनी वेळोवेळी करत […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

संघ प्रमुख मोहन भागवत यांनी श्री सत्य साई विद्यापीठाच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला हजेरी लावली होती. तेथील भाषणात त्यांनी अनेक मुद्द्यांवर सविस्तर भाष्य केले. धर्मांतराचाही उल्लेख करण्यात केला आणि लोकसंख्येवरही मोठे विधान केले आहे.

मोहन भगत यांनी स्पष्टपणे सांगितले की, केवळ जिवंत राहणे हे जीवनाचे ध्येय असू नये. मानवाची अनेक कर्तव्ये आहेत, जी त्यांनी वेळोवेळी करत राहिली पाहिजे. या संदर्भात ते म्हणाले की खाणं आणि लोकसंख्या वाढवनं हे काम फक्त प्राणीच करू शकतात. इथे फक्त पराक्रमी लोकच टिकतील, हा जंगलाचा नियम आहे. त्याच वेळी, जेव्हा शक्तीशाली इतरांचे रक्षण करू लागतात, तेव्हा ते मानवाचे लक्षण आहे.

सध्या देशात लोकसंख्येवरून वाद सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच यूएनच्या अहवालात भारत लवकरच चीनला मागे टाकेल, असे म्हटले आहे. त्यावरुन मोहन भागवतांच्या या विधानाला महत्त्व आहे. आपल्या भाषणात त्यांनी वाढत्या लोकसंख्येवर थेट काहीही न बोलता प्राणी आणि माणूस यांच्यातील फरक सांगून मोठा संदेश दिला आहे.

या समारंभात संघप्रमुख भारताच्या विकासावरही भरभरून बोलले. त्यांच्या मते, गेल्या काही वर्षांत देशाने खूप प्रगती केली आहे, खूप विकास केला आहे. या संदर्भात ते म्हणतात की, भारताने गेल्या काही वर्षांत इतिहासातील गोष्टींपासून शिकून आणि भविष्यातील कल्पना समजून घेऊन आपला योग्य विकास केला आहे. हे 10-12 वर्षांपूर्वी कोणी बोलले असते तर कोणीही ते गांभीर्याने घेतले नसते.

हे वाचलं का?

    follow whatsapp