RSS मुस्लिम ब्रदरहूडसारखी कट्टरपंथी संघटना, राहुल गांधींचा पुन्हा हल्ला
Rahul Gandhi statement on RSS : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला लक्ष्य केलं. लंडनमधील थिंक टँक चैथम हाऊसमध्ये बोलताना राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूड संघटनेशी केली. या कार्यक्रमात गांधींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना आरएसएस कट्टरपंथी आणि फॅसिस्टवादी संघटना असल्याचं सांगितलं. राहुल गांधींच्या विधानानंतर भाजपनेही टीका केली आहे. […]
ADVERTISEMENT

Rahul Gandhi statement on RSS : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघटनेला लक्ष्य केलं. लंडनमधील थिंक टँक चैथम हाऊसमध्ये बोलताना राहुल गांधींनी आरएसएसची तुलना मुस्लिम ब्रदरहूड संघटनेशी केली. या कार्यक्रमात गांधींनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करताना आरएसएस कट्टरपंथी आणि फॅसिस्टवादी संघटना असल्याचं सांगितलं. राहुल गांधींच्या विधानानंतर भाजपनेही टीका केली आहे. (RSS is Fascist Organization says Rahul Gandhi)
चैथम हाऊस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी म्हणाले, “भारतात लोकशाही प्रतिस्पर्धेचं स्वरुप पूर्णपणे बदलून टाकण्यात आलं आहे. याच कारण आहे आरएसएस नावाची एक संघटना. एक कट्टरपंथी, फॅसिस्टवादी संघटना. या संघटनेनं भारतातील जवळपास सर्वच संस्थांवर कब्जा मिळवला आहे.”
राहुल गांधी पुढे असं म्हणाले की, “आरएसएस मुस्लिम ब्रदरहूडप्रमाणेच तयार करण्यात आली आहे. या संघटनेचा विचार असा आहे की, सत्तेत येण्यासाठी लोकशाही मार्गाचा अवलंब करायचा आणि सत्तेत आल्यानंतर लोकशाही प्रतिस्पर्धा पूर्णपणे संपवून टाकायची.”
राहुल गांधी वीर सावरकरांबाबत योग्यच बोलले, तुषार गांधींचा पाठिंबा