Sanjay Raut: राऊतांचे मुख्यमंत्री शिंदेच्या रेशीमबाग भेटीवर टीकास्त्र!

मुंबई तक

Sanjay Raut Criticized CM Shinde: नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (DCM Devendra Fadnavis) नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग मुख्यालयाला भेट देण्यासाठी पोहोचले. या भेटीवरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत खोचक टीका केली आहे. संजय राऊत यांनी ट्विटरवर […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

Sanjay Raut Criticized CM Shinde: नागपूर: नागपूर हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह (DCM Devendra Fadnavis) नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) रेशीमबाग मुख्यालयाला भेट देण्यासाठी पोहोचले. या भेटीवरून संजय राऊतांनी (Sanjay Raut) आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्वीट करत खोचक टीका केली आहे.

संजय राऊत यांनी ट्विटरवर या भेटीचा एक फोटो शेअर केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं की, “रेशीमबागेत जाऊन आलात आनंद आहे! या वास्तू सोबत लाखो स्वयंसेवक वर्षानुवर्षे एकनिष्ठ आहेत. त्यांनी कधीही संघ किंवा मुख्यालय हडप करण्याचा नीच प्रयत्न केला नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून संघटनेप्रती निष्ठा काय असते हे ही शिकून घेतले असते तर अजून बरे वाटले असते.” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊतांना मोठा धक्का; सावली सारखे सोबत असणारे भाऊसाहेब चौधरी शिंदे गटात

संजय राऊतांची मुख्यमंत्री शिंदेंवर टोलेबाजी…

उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांच्यात मुंबई महापालिकेमध्ये काल (२८ डिसेंबर) जोरदार राडा पाहायला मिळाला. महानगरपालिकेतील सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या मदतीने पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. त्यामुळे संभांव्य संघर्ष टळला. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट घेतली, त्यावेळी शिंदेंनी डॉ. हेडगेवारांच्या पुतळ्याला अभिवादन केले. संजय राऊत यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना अनेक टोले लगावले.

हिवाळी अधिवेशनात ‘मविआ’ची ताकद वाढणार : संजय राऊतांना घेऊन उद्धव ठाकरे नागपूरमध्ये

“संघ विचारांचा रेशीम कीडा हा फार पूर्वीपासूनच एकनाथ शिंदे यांच्या मनात आणि कानात वळवळत होता. त्यामुळे त्यांनी रेशीमबाग येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली असावी. यामध्ये काहीही चूक नाही. उद्या एकनाथ शिंदे सभागृहात खाकी पँट घालून आले तरी आम्ही त्यांचे स्वागतच करू. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही हिंदुत्त्ववादी विचारांची संघटना आहे.” या प्रकारची टोलेबाजी संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर केली.

हे वाचलं का?

    follow whatsapp