SBIची नवीन सुरक्षा प्रणाली सुरु, ATM मधून पैसै काढण्यासाठी द्यावा लागणार OTP!

एटीएमद्वारे फसवणूक टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवा नियम आणला आहे.
SBIची नवीन सुरक्षा प्रणाली सुरु, ATM मधून पैसै काढण्यासाठी द्यावा लागणार OTP!

एटीएमद्वारे फसवणूक टाळण्यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) नवा नियम आणला आहे. एसबीआयच्या ग्राहकांना आता एटीएममधून पैसै काढण्यासाठी OTP द्यावा लागणार आहे. अगोदर एटीएम पिन टाकल्यानंतर लगेच पैसे निघत होते, परंतु आता खातेदारांना पैसे काढताना ओटीपी द्यावा लागणार आहे. ही सुरक्षा फक्त एसबीआयच्या एटीएममधून १० हजार किंवा त्याहून जास्त पैसे काढणाऱ्यांसाठी आहे.

SBI ने 26 डिसेंबर 2019 रोजी Twitter वर जाहीर केले होते की ही सुविधा 1 जानेवारी 2020 पासून सर्व SBI एटीएमवरती लागू होणार आहे. "एटीएममधील अनधिकृत व्यवहारांपासून संरक्षण करण्यासाठी OTP-आधारित पैसे काढण्याची प्रणाली सादर करत आहे. ही नवीन सुरक्षा प्रणाली 1 जानेवारी 2020 पासून सर्व SBI ATM वर लागू होईल," असे SBI ने ट्विट केले आहे. एसबीआय सोशल मीडिया आणि इतर प्लॅटफॉर्मद्वारे वेळोवेळी फसवणुकीबद्दल जागरूकता निर्माण करत असते. ओटीपी हा नोंदणीकृत मोबाईल नंबरवरती पाठवला जातो. जो ओटीपी फक्त एका व्यवहारासाठी वैध असतोय

एसबीआय एटीएममधून OTP वापरुन पैसे काढण्याची पद्धत

-एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला ओटीपीची आवश्यकता लागणार आहे.

- तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक OTP पाठवला जाईल.

-ओटीपी हा चार-अंकी क्रमांक असेल जो वापरकर्त्याला एका व्यवहारासाठी मर्यादित असणार आहे.

-तुम्ही काढू इच्छित असलेली रक्कम टाकल्यानंतर एटीएम स्क्रीन ओटीपी स्क्रीन प्रदर्शित करेल.

- आता, कॅश मिळविण्यासाठी तुम्हाला या स्क्रीनवर बँकेत नोंदणीकृत तुमच्या मोबाइल नंबरवर प्राप्त झालेला OTP द्यावा लागणार आहे.

SBI सुरक्षा म्हणून अजून एक पाऊल पुढे टाकण्याच्या तयारीत आहे. "UPI वापरून सर्व बँका आणि एटीएम नेटवर्कवर कार्ड-लेस कॅश काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव आहे. व्यवहारांची सुलभता वाढवण्यासोबतच, अशा व्यवहारांसाठी प्रत्यक्ष कार्डची आवश्यकता नसल्यामुळे फसवणूक टाळण्यास मदत होईल''.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in