Sedition 124A : ‘राजद्रोहा’च्या कलमाला स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
भारतीय दंड विधान कलम १२४ अ अर्थात राजद्रोहाच्या कलमाच्या वैधतेबद्दल सुनावणी घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (११ मे) महत्त्वाचा निर्णय दिला. केंद्र सरकारकडून या कायद्याबद्दल पुनर्विचार होईपर्यंत या कलमाखाली नवीन गुन्हे दाखल करू नये, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. राजद्रोहाच्या कलमाच्या वैधतेला आव्हान सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती […]
ADVERTISEMENT

भारतीय दंड विधान कलम १२४ अ अर्थात राजद्रोहाच्या कलमाच्या वैधतेबद्दल सुनावणी घेत असताना सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी (११ मे) महत्त्वाचा निर्णय दिला. केंद्र सरकारकडून या कायद्याबद्दल पुनर्विचार होईपर्यंत या कलमाखाली नवीन गुन्हे दाखल करू नये, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
राजद्रोहाच्या कलमाच्या वैधतेला आव्हान सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेलं आहे. सरन्यायाधीश एन.व्ही. रमणा, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती हिमा कोहली या तीन सदस्यीय खंठपीठासमोर या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
बबुधवारी झालेल्या सुनावणी वेळी न्यायालयाने राजद्रोहाच्या कायद्याला स्थगिती देण्याचा निर्णय दिला. न्यायालयाने सांगितलं की, केंद्राकडून पुनर्विचार होईपर्यंत १२४ अ नुसार नवीन गुन्हे दाखल करण्यात येऊ नये. केंद्र सरकारने राज्यांना तसे निर्देश द्यावेत, असं न्यायालयानं स्पष्ट केलं.
नवनीत आणि रवी राणांविरोधात राजद्रोहाचा गुन्हा, काय असतो राजद्रोह?