Shiv Sena vs BJP: ‘भाजपचं हिंदुत्व म्हणजे ‘चोरबाजार’, देश विकलात पण..’, शिवसेनेची जहरी टीका

मुंबई तक

मुंबई: ‘अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ‘राम नाम सत्य है’ हे इतरांसाठी. भाजपसाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे! भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: ‘अयोध्येतील भूखंडाचा जो घोटाळा बाहेर आला आहे तो पाहता भाजपच्या हिंदुत्वात श्रीराम नसून फक्त व्यवहार आहे. त्यांना मंदिर हवे ते बाजूच्या जमिनी लाटण्यासाठी. त्यांचे ढोंग हे असे उघडे पडले ही श्रीरामाचीच कृपा म्हणायला हवी. ‘राम नाम सत्य है’ हे इतरांसाठी. भाजपसाठी फक्त पैसा व जमिनी हेच सत्य आहे! भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजार’आहे हे वारंवार उघड होत आहे.’ अशा बोचऱ्या शब्दात शिवसेनेने आपलं मुखपत्र असलेल्या ‘सामना’तून भाजपवर अत्यंत जहरी अशी टीका केली आहे.

‘लोकांना वाटले देवाच्या आळंदीत जायचे आहे, पण भाजपवाले चोराच्या आळंदीत घेऊन चालले आहेत. अयोध्येस चोरांची आळंदी करणाऱ्यांना श्रीराम माफ करणार नाहीत. देश विकलात, पण अयोध्या विकता येणार नाही. कारण शिवसेना हिंदुत्वाचा भगवा झेंडा घेऊन उभी आहे.’ असं म्हणत शिवसेनेने भाजपचं थेट आव्हानच दिलं आहे. शिवसेनेने केलेली ही टीका भाजपच्या नक्कीच जिव्हारी लागणारी अशीच आहे. त्यामुळे आता ते शिवसेनेला काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

‘सामना’च्या अग्रलेखातील काही महत्त्वाचे मुद्दे:

  • भारतीय जनता पक्षाचे हिंदुत्व म्हणजे एकप्रकारचा ‘चोरबाजार’ आहे हे वारंवार उघड होत आहे. त्या चोरबाजारात आता अयोध्येचा जमीन व्यवहारही सामील झाला आहे. अयोध्या निकालानंतर राममंदिर परिसरात भाजप पुढारी, भाजपचे आमदार, महापौर, भाजप गटातील नोकरशाही मंडळींनी वैध-अवैध मार्गाने जमिनी खरेदी केल्या. हे व्यवहार संशयास्पद, तितकेच धक्कादायक आहेत.

हे वाचलं का?

    follow whatsapp