Shiv Sena MLA: सेक्सटॉर्शन प्रकरणी शिवसेना आमदार कुडाळकरांनी दिली प्रतिक्रिया म्हणाले..

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

एजाज खान, मुंबई

मुंबईतील शिवसेनेचे आमदार मंगेश कुडाळकर यांना सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून त्यांना ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला मुंबई पोलिसांनी अटक केली असून आता याबाबत स्वत: आमदार कुडाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी मी मुंबई पोलिसांची मदत घेतली त्यामुळेच आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहे.’ असं कुडाळकर म्हणाले आहेत.

पाहा आमदार मंगेश कुडाळकर नेमकं काय म्हणाले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘हा प्रकार उघडकीस यावा आणि हे रॅकेट पकडलं जावं या एका भावनेने मी हे संपूर्ण प्रकरण मुंबई सायबर क्राइमला सुपूर्द केलं. जेव्हा मला अशा प्रकारचा मेसेज यायला सुरुवात झाली की, मदतीची अपेक्षा शैक्षणिक किंवा आरोग्याच्या दृष्टीने. त्यानंतर ज्या प्रकारे ते बोलत होते त्यावरुन मला जरा शंका आली. त्यामुळे मी तातडीने माझ्या मित्रांच्या सल्ल्याने मुंबई सायबर क्राइमला तक्रार केली.’

‘त्याठिकाणी डीसीपी मॅडम रश्मी करंदीकर यांनी खूप चांगलं सहकार्य केलं. मुंबई पोलिसांनी चांगल्या प्रकारे तपास केला. या रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी त्यांनी राजस्थानला एक टीम पाठवली होती. त्यांनी हे संपूर्ण रॅकेट उदध्वस्त केलं आहे.’

ADVERTISEMENT

‘याप्रकरणी आता मी पुढे आलेलो आहे. पण संपूर्ण देशभरात त्यांनी नामवंत, प्रतिष्ठित लोकांना देखील यांनी कॉल करुन ब्लॅकमेल केलेलं आहे. अशा सर्वच रॅकेटचा पर्दाफाश हा या माध्यमातून होईल. माझं आवाहनच आहे सगळ्यांना की, सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप असेल, फेसबुक असेल किंवां इस्टाग्राम वैगरे. विविध असे माध्यम आहेत जे आपणही जबाबदारीने सांभाळली पाहिजेत.’

ADVERTISEMENT

‘जर आपल्याला अनोळखी नंबरवरुन मेसेज किंवा फोन येत असतील तर सावधानतेने या गोष्ठी वापराव्या लागतील.’

‘दरम्यान, आपल्या सोबत देखील असं काही घडलं असेल तर आपण न घाबरता न डगमगता मुंबई पोलीस किंवा सायबर क्राईममध्ये तक्रार दाखल करा. नक्कीच अजूनही काही रॅकेट असतील या देशभरात आणि मुंबई, महाराष्ट्रात.. तर असे रॅकेट ते नक्कीच उदध्वस्त करतील.’

‘आत्ताचं जे रॅकेट उदध्वस्त केलं आहे. ते पाहता मुंबई पोलिसांना मी सलाम करतो की, त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे. आज बऱ्याच लोकांना जो काही त्रास झालेला आहे तो त्रास सुद्धा उघडकीस आला आणि त्याचबरोबर पुढे सुद्धा अशा स्वरुपाचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. आज जे रॅकेट उदध्वस्त झालं ते पाहता आता अशाप्रकारच्या रॅकेटला आता आळा बसेल.’

‘मला जेव्हा शंका आली तेव्हा मी सायबर क्राइममध्ये गेलो. तिथे जे काही विषय होते ते त्यांना सांगितले. पण याबाबत अधिक काही मी बोलू शकत नाही. कारण अजूनही याचा तपास सुरु आहे. पण मुंबई पोलिसांनी जो काही प्लॅन सांगितला होता त्यानुसार मी त्यांना सहकार्य केलं आणि त्यामुळेच आरोपी आता पोलिसांच्या ताब्यात आहे.’ अशी माहिती आमदार कुडाळकर यांनी दिली आहे.

Mumbai: मुंबईतील शिवसेना आमदाराला सेक्स चॅट केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न

नेमकं प्रकरण काय?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर यांना 20 ऑक्टोबर रोजी रात्री एक मेसेज आला. हा मेसेज मौसमदीन नावाच्या एका व्यक्तीने केला होता. चॅटिंगमध्ये आपण महिला असल्याचं भासवून त्याने आमदार कुडाळकर यांच्याकडे मदत मागितली. आमदार कुडाळकर देखील मदतीसाठी तयार झाले. त्यानंतर थोड्याच वेळाने आमदार कुडाळकरांच्या मोबाइलवर एका महिलेचा व्हीडिओ कॉल आला.

या महिलेने कुडाळकरांशी साधारण 15 सेकंद बातचीत केली आणि त्यांच्याकडे मदत मागितली. दरम्यान, हा कॉल कट झाल्यानंतर काही वेळाने कुडाळकरांच्या मोबाइलवर याच नंबरवरुन एक व्हीडिओ पाठविण्यात आला. जो एडिट करण्यात आला होता. हा व्हीडिओ पाठवून आरोपीने आमदार कुडाळकर यांच्याकडे तात्काळ 5 हजार रुपयांची मागणी केली. कुडाळकर यांनी देखील फोन-पे वरुन आरोपीला 5 हजार रुपये दिले.

दरम्यान, दुसऱ्या दिवशी एका वेगळ्याच नंबरवरुन मंगेश कुडाळकर यांना फोन आला. त्यावेळी आरोपीने पुन्हा एकदा अश्लील व्हीडिओच्या नावाखाली ब्लॅकमेल त्यांच्याकडे 11 हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर मात्र आमदार कुडाळकर यांनी पोलीस ठाण्यात सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून ब्लॅकमेलिंग केलं जात असल्याची तक्रार नोंदवली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT