Advertisement

ईडीची नोटीस! कंगना, अर्णब यांचं नाव घेत प्रताप सरनाईकांनी सांगितलं कारवाईचं कारण

ईडीकडून प्रताप सरनाईकांना संपत्ती जप्तीची नोटीस : सरनाईकांनी स्पष्ट केली भूमिका
ईडीची नोटीस! कंगना, अर्णब यांचं नाव घेत प्रताप सरनाईकांनी सांगितलं कारवाईचं कारण

शिवसेनेचे आमदार तथा प्रवक्ते प्रताप सरनाईक यांच्यामागे जुन्याच प्रकरणात ईडीचा नव्याने ससेमिरा लागला आहे. ईडीकडून सरनाईक यांच्या संपत्तीवर टाच आणली जात असून, या कारवाईला आपण न्यायालयात आव्हान देणार असल्याचं सरनाईक यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर त्यांनी इतरही महत्त्वाची माहिती दिली.

विधानभवनात माध्यमांशी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले, "मला ठाण्यातील हिरानंदानी ईस्टेटमधील राहतं घर आणि मीरा रोड येथील अडीचशे चौरसमीटर क्षेत्रफळ असलेल्या संपत्ती जप्त करण्यासंदर्भातील ईडीची नोटीस मिळाल्याची माहिती खरी आहे. या प्रकरणात ईडीला संपूर्ण सहकार्य करण्याचं आम्ही ठरवलं आहे. देशातील न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि संबंधित कायदेशीर अधिकारांचा वापर करणार आहोत. ३० दिवसांत आम्ही या संपत्ती जप्तीच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान देणार आहोत," अशी माहिती सरनाईक यांनी दिली.

"आता २०२२ सुरू आहे. मला पहिल्यांदा २० नोव्हेंबर २०२० रोजी ईडीकडून पहिली नोटीस बजावण्यात आली होती आणि तेव्हाही मी म्हटलं होतं की, केंद्र आणि राज्यातील संघर्षात मी फसलो आहे. कारण त्यावेळी मी कंगना रणौत आणि अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध महाराष्ट्राच्या विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल केला होता. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमच्या परिवाराचे प्रमुख आहेत आणि संपूर्ण सरनाईक कुटुंबावर त्यांच्या आशीर्वाद आहे. मी अचानक राजकारणात आलो किवा मी व्यवसाय सुरू केला, असं नाहीये", असंही सरनाईक यांनी यावेळी सांगितलं.

ईडीची नोटीस! कंगना, अर्णब यांचं नाव घेत प्रताप सरनाईकांनी सांगितलं कारवाईचं कारण
शिवसेनेला दुसरा धक्का... प्रताप सरनाईकांची 11 कोटी 35 लाखांची मालमत्ता ईडीकडून जप्त
"मी वयाच्या १८व्या वर्षांपासून विद्यार्थी चळवळीच्या माध्यमातून राजकारणात आलो. १९९० पासून माझी कंपनी सुरू आहे आणि माझा राजकीय प्रवासही सुरूवातीला नगरसेवक आणि त्यानंतर आमदार बनलो, असा आहे. आता मी शिवसेनेचा प्रवक्ताही आहे. एकूणच अशा प्रकारे माझा राजकीय प्रवास आहे."

भारतीय न्यायव्यवस्थेवर आणि न्यायालयांवर आमचा विश्वास आहे. आम्ही कायदेशीर अधिकारांचा वापर करु. त्याचबरोबर मी पुन्हा एकदा स्पष्ट करू इच्छितो की, ईडीला आमच्याकडून जे सहकार्य अपेक्षित आहे, ते आम्ही पूर्णपणे करू. हे सगळं तुमच्यासमोर मांडत आहे, कारण इथे आल्यानंतर लोक वेगवेगळी चर्चा करत असल्याचं मला कळलं. प्रताप सरनाईक यांचं घर जप्त झालं. अमूक एक मालमत्ता जप्त केली गेलीये, अशा पद्धतीने. त्यामुळे माझी इच्छा होती की, समोर येऊ सत्य माहिती द्यावी. जेणेकरून यासंदर्भात जो भ्रम निर्माण झाला आहे, तो दूर होईल आणि सत्य सगळ्यांसमोर येईल", असं सांगत सरनाईक यांनी सविस्तर भूमिका मांडली.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in