वर सत्तेत असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही - Shivsena नेते विजय शिवतारेंची कबुली

नाव न घेता शिवतारेंचा अजित पवारांनाही टोला
वर सत्तेत असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही - Shivsena नेते विजय शिवतारेंची कबुली

राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन बराच कालावधी लोटला, परंतू तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये एकवाक्यता नसल्याचं अनेक प्रसंग समोर आले आहेत. त्यातच आज शिवसेना नेते विजय शिवतारे यांनी कार्यकर्त्यांमध्येही ताळमेळ नसल्याचं कबुली दिली आहे, ते पुण्यात बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत म्हणजे वन मॅन आर्मी आहेत. त्यांच्यामुळे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं आहे, असं सांगतानाच वर आपलं सरकार आहे. मुख्यमंत्री आपलेच आहेत. महाविकास आघाडी आपली आहे. सत्तेत येण्याचं आपलं स्वप्न पूर्ण झालं आहे. पण खाली तिन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांचा ताळमेळ बसत नाही. वर नेते एकत्र आले तरी खाली कार्यकर्त्यांची डोके फोड सुरूच आहे. संघटनेने शिवसैनिकाला बळ द्यावं, असं शिवतारेंनी जाहीरपणे भाषणात सांगितलं.

वर सत्तेत असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही - Shivsena नेते विजय शिवतारेंची कबुली
'त्यांनी' थोडा हात दिला असता तर आपले आढळराव आज लोकसभेत असते'

यावेळी बोलत असताना शिवतारेंनी नाव न घेता अजित पवारांवरही टीका केली. "मावळमध्ये पार्थ पवार यांच्या विरोधात बारणे यांना निवडून आण्यासाठी आपण ताकतीने लढलो आणि आपली सीट आणली. त्यामुळेच या गोष्टीची खुन्नस खाऊन विजय शिवतरे कसा निवडून येतो असे हे लोक म्हणायचे", असा टोला त्यांनी अजितदादांना लगावला. यावर अधिक बोलणं योग्य नाही. जास्त बोलण्याचा परिणाम मी भोगत आहे, असंही ते म्हणाले.

वर सत्तेत असलो तरी खाली कार्यकर्त्यांमध्ये ताळमेळ नाही - Shivsena नेते विजय शिवतारेंची कबुली
शिवसैनिकांना स्वबळाच्या तयारीचे आदेश, अजित पवारांना सूचक इशारा; संजय राऊत म्हणतात...

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in