धक्कादायक! नाशिकमध्ये प्राणायम करता करता 30 वर्षीय महिलेचा मृत्यू
प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक थंडीच्या दिवसांमध्ये सध्या प्रत्येक जण व्यायाम करण्याकडे लक्ष देत असतो. मात्र त्याचा अतिरेक केल्यास जीवही जाऊ शकतो. नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली आहे. नाशिकमध्ये प्राणायाम करताना असाच एका तीस वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. श्वास घेताना तिला त्रास होऊ लागला आणि श्वास अडकल्याने ती जागीच कोसळली .नाशिकच्या मखमलाबाद परिसरात विद्या नगर […]
ADVERTISEMENT

प्रवीण ठाकरे, प्रतिनिधी, नाशिक
थंडीच्या दिवसांमध्ये सध्या प्रत्येक जण व्यायाम करण्याकडे लक्ष देत असतो. मात्र त्याचा अतिरेक केल्यास जीवही जाऊ शकतो. नाशिकमध्ये अशीच एक घटना घडली आहे. नाशिकमध्ये प्राणायाम करताना असाच एका तीस वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला. श्वास घेताना तिला त्रास होऊ लागला आणि श्वास अडकल्याने ती जागीच कोसळली .नाशिकच्या मखमलाबाद परिसरात विद्या नगर मध्ये राहणाऱ्या या महिलेचे नाव सोनल आव्हाड असे आहे.
नागपूर : ८० वर्षीय वृद्धाचा अपघातात मृत्यू, पोलिसांनी ४ महिन्यांनी मयत वृद्धावरच दाखल केला गुन्हा
नेहमी हसतमुख असणाऱ्या सोनलला आज प्राणायाम करता करता आपला जीव गमवावा लागला आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आलं.