सोलापूर : सराईत मोटारसायकल चोराला अटक, ६ गुन्हे उघड

७ दुचाकी पोलिसांनी घेतल्या ताब्यात
सोलापूर : सराईत मोटारसायकल चोराला अटक, ६ गुन्हे उघड

सोलापूर पोलिसांनी शहरातील विजापूर नाका पोलीस स्टेशन, सदर बाजार पोलीस स्टेशन आणि एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत धुमाकूळ घालणाऱ्या एका मोटारसायकल चोराला अटक केली आहे. या चोराकडून पोलिसांनी ७ दुचाकींसह ३ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल इमरान जमादार आणि आतिश पाटील यांनी आसरा चौक होडगी रोड येथे आलेल्या संशयित मोटरसायकल चोर नितीन उर्फ निखील मारुती कांबळे याला सापळा रचून मोटरसायकल चोरताना रंगेहाथ पकडलं.

आरोपीला ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने विजापूर नाका पोलीस स्टेशनच्या हद्दीतील २, सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ३ आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १ अशा ३ लाख ७० हजाराच्या ६ मोटारसायकली चोरल्याचे कबूल केले. अन्य एक मोटरसायकल चोरीबाबत पोलीस माहिती घेत असून या आरोपी कडून आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in