आर्यन खान ड्रग केस: '...तर पुणे कोर्टात जा', विशेष कोर्टाने NCB चा अर्ज फेटाळला

Special Court rejected the application filed by NCB: आर्यन खान प्रकरणात पंच असलेल्या किरण गोसावीचा जबाब हवा असल्यास एनसीबीने पुणे कोर्टात जावं असं म्हणत स्पेशल कोर्टाने त्यांचा अर्ज फेटाळला आहे.
आर्यन खान ड्रग केस: '...तर पुणे कोर्टात जा', विशेष कोर्टाने NCB चा अर्ज फेटाळला
special court rejected the application filed by ncb record statement panch witness kiran gosavi aryan khan drugs case(फाइल फोटो)

मुंबई: मुंबईतील विशेष NDPS कोर्टाने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोची एक महत्त्वपूर्ण अर्ज फेटाळून लावला आहे. दोन ऑक्टोबरला एका क्रूझवरील अंमली पदार्थांच्या जप्ती प्रकरणी पंच आणि स्वतंत्र साक्षीदार किरण गोसावी याचा जबाब नोंदवण्याची मागणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कोर्टाकडे केली होती. पण कोर्टाने त्यांची ही मागणी फेटाळून लावत NCB ला पुणे कोर्टात जाण्यास सांगितलं आहे. पुण्यातील काही पोलीस ठाण्यात फसवणुकीच्या गुन्ह्यात किरण गोसावी हा सध्या येरवडा कारागृहात आहेत.

2 ऑक्टोबरच्या क्रूझ ड्रग्स प्रकरणातील पंच आणि साक्षीदार किरण गोसावी याला काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी अटक केली होती आणि सध्या तो येरवडा कारागृहात आहे. त्यामुळेच कोर्टाने एनसीबीला त्याच्या जबाबासाठी पुणे कोर्टात जाण्यास सांगितलं आहे.

एनडीपीएस न्यायालयाचे विशेष न्यायाधीश व्ही.व्ही.पाटील यांनी एनसीबीचा युक्तिवाद ऐकल्यानंतर असं निर्णय दिला की, 'साक्षीदार गोसावी यांचा जबाब अर्जदार एजन्सीला (NCB) नोंदवायचा आहे ते या न्यायालयाच्या न्यायालयीन कोठडीत नसून, जेएमएफसी न्यायालय, पुणे यांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. त्यामुळे अर्जदार एजन्सीने संबंधित न्यायालयाकडे याबाबतचा अर्ज करावा.'

न्यायाधीश पाटील हे पुणे न्यायालयाशी याबाबत एक पत्र पाठवतील अशी एजन्सीला अपेक्षा होती. मात्र न्यायालयाने तसे करण्यास नकार दिल्याने आता एनसीबी पुणे न्यायालयात जाणार आहे.

2 ऑक्टोबर रोजी जेव्हा एनसीबीने मुंबईत क्रूझवर छापा मारला आणि त्यानंतर जेव्हा आरोपींना एनसीबी कार्यालयात आणलं गेलं तेव्हा किरण गोसावी हा स्वत: शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा हात धरून त्याला एनसीबी कार्यालयात घेऊन जाताना दिसला होता. त्याचवेळी त्याचा आर्यन खानसोबतचा एक सेल्फी देखील प्रचंड व्हायरल झाला होता.

तेव्हापासूनच किरण गोसावी हा वादात सापडला होता. तो केवळ एक पंच-साक्षीदार असताना एखाद्या NCB अधिकाऱ्याप्रमाणे कसं काय काम करु शकतो? असा सवाल अनेकांनी उपस्थित केला होता.

दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन किरण गोसावी याच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले होते. तेव्हापासून या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण लागलं. याचवेळी किरण गोसावी याच्याविरोधात पुण्यासह राज्यात अनेक ठिकाणी आर्थिक फसवणूक केल्याचे गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं होतं.

ज्यानंतर गोसावी हा अनेक दिवसांसाठी फरार झाला होता. मात्र, काही दिवसांपूर्वीच पुणे पोलिसांनी त्याला अटक केली. सध्या तो न्यायालयीन कोठीडत आहे.

special court rejected the application filed by ncb record statement panch witness kiran gosavi aryan khan drugs case
समीर वानखेडे-किरण गोसावी यांच्यात काय बोलणं झालं? प्रभाकर साईलने NCB ला काय सांगितलं?

दरम्यान, क्रूझ ड्रग्स प्रकरणात किरण गोसावी हा संपूर्णपणे सक्रीय होता. त्यामुळे आता एनसीबीची तपास समिती देखील त्याचा जबाब नोंदवण्याचा प्रयत्न करत आहे. नवाब मलिक यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर आता या सगळ्या प्रकरणी खात्यातंर्गत चौकशी सुरु झाली आहे.

यासाठी एनसीबीकडून वेगवेगळ्या लोकांची चौकशी केली जात आहे. याच प्रकरणी त्यांना केपी गोसावी याचा जबाब नोंदवायचा आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आता पुणे कोर्टाची परवानगी घ्यावी लागणार आहे.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in