मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम

१७ सप्टेंबरला सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत होणार लसीकरण
मुंबई महापालिकेकडून महिलांसाठी विशेष लसीकरण मोहीम
मुंबईतील लसीकरण केंद्रावर लस घेताना लाभार्थी. (प्रातिनिधीक छायाचित्र)

कोरोनाविरुद्ध लढाईत शहरातील लसीकरण मोहीमेला विशेष प्रोत्साहन देण्यासाठी मुंबई महापालिकेने विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील २४ वॉर्डांमध्ये महापालिका फक्त महिलांसाठी लसीकरण मोहीम राबवणार आहे. १७ सप्टेंबर रोजी ही लसीकरण मोहीम सरकारी केंद्रांमध्ये राबवली जाणार असून सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसहा वाजल्याच्या दरम्यान ही मोहीम राबवली जाणार आहे.

या लसीकरण मोहीमेत महिलांना पहिला-दुसरा डोस थेट मिळणार असल्यामुळे या दिवशी लसींसाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद ठेवण्यात आलं आहे. सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता लसीकरण सर्वांना मिळावं यासाठी महापालिकेचे अधिकारी प्रयत्न करत आहेत. मुंबईत सध्याच्या घडीला ४ हजारापेक्षा जास्त कोरोनाचे सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईत सध्या ३७ इमारती सील करण्यात आल्या असून १५ सप्टेंबरला शहरात ५१४ नवे रुग्ण सापडले असून ४ जणांचा मृत्यू झाला.

Related Stories

No stories found.
Mumbai Tak
www.mumbaitak.in