Mann Ki Baat चा 100 वा भाग भाजप करणार बिग इव्हेंट… आखला खास प्लॅन

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

The 100th episode of Mann Ki Baat :

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचा ‘मन की बात’ (Mann Ki Baat) हा रेडिओवरील कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होतो. पंतप्रधानांच्या या कार्यक्रमाचे आतापर्यंत 98 भाग प्रसारित झाले आहेत. त्यानंतर आता देशवासियांना या कार्यक्रमच्या 100 व्या भागाचे वेध लागले आहेत. दरम्यान, मन की बातचा 100 वा भाग पुढील महिन्यात 30 एप्रिलला प्रसारित होणार आहे. पण यासाठी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. (The 100th episode of Prime Minister Narendra Modi’s monthly radio program Mann Ki Baat is to be broadcast on 30 April)

मिळालेल्या माहितीनुसार, मन की बातचा 100 वा भाग 30 एप्रिल रोजी प्रसारित होणार आहे. त्याचा बिग इव्हेंट करण्यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. या कार्यक्रमाचा 100 वा भाग देशभरातील एक लाखांहून अधिक बूथवर प्रसारित करण्याची भाजपची योजना आखली आहे. तसंच या कार्यक्रमाच्या 100 व्या भागाचे प्रसारण परदेशातही प्रसारित करण्यासाठी भाजपची योजना आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बातमध्ये आतापर्यंत नमूद केलेल्या सर्वांना 30 एप्रिलच्या या रेडिओ कार्यक्रमाशी जोडण्याची भाजपने तयारी केली आहे. याशिवाय भाजपची सत्ता असलेल्या प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षाचे वरिष्ठ नेतेही मन की बात कार्यक्रम ऐकणार आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात किमान 100 जागांवर ‘मन की बात’ ऐकावी, हे टार्गेट ठरवून पक्षाने तयारी सुरू केली आहे.

गुणरत्न सदावर्तेंवर कारवाई अटळ! हायकोर्टाचा दणका; नेमकं प्रकरण काय?

ADVERTISEMENT

2014 च्या लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवून सत्तेवर आल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी मन की बात कार्यक्रम सुरू केला.मोदींच्या मन की बात कार्यक्रमाचा पहिला भाग ३ ऑक्टोबर २०१४ रोजी दसऱ्याच्या दिवशी प्रसारित झाला होता.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT