Indonesia Football Match : फुटबॉल सामन्यात मोठा हिंसाचार; 127 लोकांचा मृत्यू
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यात संघ पराभूत झाल्याने हताश होऊन समर्थकांनी मैदानावर घातलेल्या गोंधळामुळे मोठा हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. एएफपी या न्यूज एजन्सीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात तब्बल 127 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे. या हिंसाचारात 34 जणांचा मैदानात मृत्यू झाला तर उर्वरीत 93 जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये […]
ADVERTISEMENT
इंडोनेशिया : इंडोनेशियामध्ये फुटबॉल सामन्यात संघ पराभूत झाल्याने हताश होऊन समर्थकांनी मैदानावर घातलेल्या गोंधळामुळे मोठा हिंसाचार झाल्याचे वृत्त समोर येत आहे. एएफपी या न्यूज एजन्सीने पोलिसांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार या हिंसाचारात तब्बल 127 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती आहे.
ADVERTISEMENT
या हिंसाचारात 34 जणांचा मैदानात मृत्यू झाला तर उर्वरीत 93 जणांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन पोलिसांचाही समावेश आहे. याशिवाय हिंसाचाराच्या विविध घटनांमध्ये 200 हुन अधिक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
#URGENT The deaths occurred when angry fans invaded a football pitch after a match in East Java late Saturday, police said.
Two of the dead were police. “Thirty-four people died inside the stadium and the rest died in hospital,” East Java police chief Nico Afinta said Sunday.— AFP News Agency (@AFP) October 2, 2022
इंडोनेशियामधील पूर्व जावाच्या मलंग भागातील कंजुरुहान स्टेडियममध्ये अरेमा एफसी आणि पर्सेबाया सुराबाया यांच्यात फुटबॉल सामना सुरु होता. या सामन्यादरम्यान अरेमाचा संघ पराभूत झाला. त्यानंतर अरेमाच्या हताश समर्थकांनी मैदानावरच गोंधळास सुरुवात केली. या गोंधळातच प्रेक्षकांची धावाधाव आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली आणि मोठा हिंसाचार उसळला अशी प्राथमिक माहिती आहे.
हे वाचलं का?
स्टेडियममधील चेंगराचेंगरी रोखण्यासाठी पोलीस पुढे आले. मात्र, त्यांनाही ते थांबवता आले नाही. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्याचा वापर केला. स्टेडियममधील गोंधळ काही वेळात थांबला, पण संतप्त लोक रस्त्यावर आले, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या अनेक व्हिडिओंमध्ये लोकांनी सीमा ओलांडून पळून जाण्याचाही प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT