Online Game मध्ये पालकांचे ४० हजार उडवले, आईने ओरडल्यानंतर अल्पवयीन मुलाची आत्महत्या

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ऑनलाईन गेमिंगमध्ये पालकांचे ४० हजार गमावल्यानंतर, एका १३ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. मध्य प्रदेशमधील छत्तरपूर जिल्ह्यात ही घटना घडली आहे. Free Fire नावाच्या एका ऑनलाईन गेमध्ये मुलाने ४० हजार रुपये वाया घालवल्यानंतर मुलाने आपल्याला ओरडा बसेल म्हणून हे पाऊल उचललं. या घटनेनंतर छत्तरपूरमधील शांती नगर परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना घडली त्यावेळी मुलगा आणि त्याची बहिण घरात एकटी होती. आई कामावर असताना तिला मोबाईलवर आपल्या खात्यामधून दीड हजार रुपये कट झाल्याचा मेसेज आला. यानंतर मुलाच्या आईने त्याला फोन करत याबद्दल विचारणा केली. ज्यानंतर मुलानेही आपण दीड हजार रुपये वापरल्याचं सांगितलं. हे समजताच मुलाच्या आईने त्याला चांगलीच समज दिली. या घटनेनंतर मुलाने आपल्या खोलीत जाऊन पंख्याला गळफास घेत आपलं जीवन संपवलं.

या घटनेचा तपास करायला आलेल्या पोलिसांना मुलाने लिहून ठेवलेली एक सुसाईड नोट सापडली. ज्यात त्याने पालकाचे ४० हजार रुपये ऑनलाईन गेमिंगवर उडवल्याचं कबूल केलं. पोस्टमार्टम झाल्यानंतर मुलाचा मृतदेह त्याच्या पालकांच्या ताब्यात सोपवण्यात आला आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहेत. मुलाने ४० हजारांऐवढी मोठी रक्कम ही स्वतःहून खर्च केली की त्याला असं करायला कोणी भाग पाडत होतं याचा शोध सध्या घेतला जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT