पुणे हादरलं! वडील-काकांचा 17 वर्षीय तरुणीवर बलात्कार; आजोबांनी केला विनयभंग

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

पुणे : शहरातील धानोरी भागात राहणार्‍या 17 वर्षीय तरुणीवर वडील आणि काकांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. तर आजोबांनी विनयभंग केल्याचं उघड झालं आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी वडील-अजय रामेश्वर सिंह (वय 49), चुलता-विजय रामेश्वर सिंह (वय 33) आणि आजोबा रामेश्वर पोलहान सिंह (वय 70) या तिघांविरोधात विश्रांतवाडी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, 17 वर्षीय पीडित तरुणी उत्तर प्रदेश येथील महुआरकला, चंदोली येथे तिच्या मूळगावी 2016 ते 2018 दरम्यान गेली होती. त्यावेळी काका विजय रामेश्वर सिंह याने तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. तर आजोबा रामेश्वर पोलहान सिंह यानेही तिचा विनयभंग केला.

त्यानंतर ती पीडित तरुणी पुण्यातील धानोरी भागात कुटुंबियांसोबत राहण्यास आली. त्यावेळी वडील अजय रामेश्वर सिंह यांनी देखील तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. कुटुंबातील व्यक्तीकडून तिच्यावर होत असलेल्या अत्याचारांमुळे ती शांत राहायची. यादरम्यान, तरुणीच्या महाविद्यालयात समुपदेशनचा कार्यक्रम होता. त्यावेळी तिने तिथल्या व्यक्तींना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला.

हे वाचलं का?

त्यानंतर तिने पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीवरुन वडील, काका यांच्यावर बलात्कार आणि आजोबांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. यातील आरोपी वडील अजय रामेश्वर सिंह याला अटक करण्यात आली असून अन्य दोघांना अटक करण्यासाठी उत्तर प्रदेश येथे पथक रवाना करण्यात येणार असल्याचं विश्रांतवाडी पोलिसांनी सांगितलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT