शिंदे गटाचे २२ आमदार फुटणार? का होते आहे चर्चा? वाचा सविस्तर बातमी

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

एकनाथ शिंदेंनी ठाकरेंविरुद्ध बंडाचं निशाण फडकवत शिवसेनेची ४० आमदार फोडले. त्यामुळे उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून पायउतार व्हावं लागलं आणि त्याच जागेवर काही तासांत एकनाथ शिंदे बसले. ४० आमदारांच्या जीवावर शिंदेंनी हे सगळं घडवून आणलं. पण आता शिंदे गटातलेच आमदार फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. एवढंच नाही, तर किती आमदार आणि का फुटणार याचं गणितही सामनातून मांडण्यात आलंय. नेमका गौप्यस्फोट काय आणि महाराष्ट्राच्या राजकारणातून यामुळे कसा ट्विस्ट निर्माण झाल्याची चर्चा आहे.

ADVERTISEMENT

शिवसेनेत अभूतपूर्व बंड

शिवसेनेतल्या बंडानंतर ठाकरे-शिंदेंकडून आपणच कसे सच्चे बाळासाहेबांचे वारसदार आहोत, हे सांगण्यासाठी चढाओढ लागलीय. शिवसेनेवरही दावा ठोकला जातोय. दोघांकडून एकमेकांना शह-प्रतिशह देण्याचे डाव टाकले जात आहेत. तसंच ४० पैकी काही आमदार ठाकरेंच्या संपर्कात असल्याचे दावेही केले जात आहे. या सगळ्या दाव्या-प्रतिदाव्यांच्या पार्श्वभूमीवर एक नवा गौप्यस्फोट करण्यात आलाय. आणि हा गौप्यस्फोट दुसऱ्या तिसऱ्याने नाही, तर थेट सामनातून करण्यात आलाय. रविवारी २३ ऑक्टोबरला सामनाच्या रोखठोक सदरात कडकनाथ मुंबैकर यांनी हा गौप्यस्फोट केलाय.

शेतकऱ्यांनी गावं विकायला काढली या शीर्षकाखाली लेख

शेतकऱ्यांनी गावे विकायला काढली, आपले राज्यपाल कोठे आहेत? अशा शीर्षकाखाली हा लेख आलाय. यामध्ये अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचं सांगताना शिंदे सरकारवर हल्ला चढवण्यात आलाय. कडकनाथ मुंबैकर लिहितात,

हे वाचलं का?

‘मुख्यमंत्रिपदी शिंदे ही भाजपने केलेली तात्पुरती व्यवस्था आहे. त्यांची मुख्यमंत्रिपदाची वर्दी कधीही उतरवली जाईल, हे आता सगळ्यांना समजून चुकले आहे. शिंदे यांच्या ‘तोतया’ गटास अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत उतरवायला हवे होते. पण भाजपनेच ते टाळले. महाराष्ट्राच्या ग्रामपंचायत, सरपंच निवडणुकीत यश मिळाल्याचा शिंदे गटाचा दावा खोटा आहे. शिंदे गटाचे किमान 22 आमदार नाराज आहेत. यातील बहुसंख्य आमदार स्वतःला भाजपात विलीन करून घेतील असे स्पष्ट दिसते. त्यानंतर शिंदे यांचे काय होणार, असे मी त्यांच्याच एका नेत्यास विचारले तेव्हा तो म्हणाला, “शिंदे यांचा रामदास आठवले होईल.’’ हे विधान बोलके आहे’ असा दावा शिवसेनेनं केला आहे.

महाराष्ट्र एकनाथ शिंदेना माफ करणार नाही असाही उल्लेख

एकनाथ शिंदे यांनी स्वतःबरोबर महाराष्ट्राचे मोठे नुकसान केले. त्यामुळे महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही. शिंदे यांना तोफेच्या तोंडी देऊन भाजप स्वतःचे राजकारण करत राहील. भाजपचे नेते सरळ सांगतात, “शिंदे यांनाही उद्या भाजपातच विलीन व्हावे लागेल आणि त्यावेळी ते नारायण राणे यांच्या भूमिकेत असतील.’’ असे घडले तर शिंदे यांनी काय मिळवले? मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान दिसत नाही. सर्वत्र देवेंद्र फडणवीस दिसत आहेत.

ADVERTISEMENT

.

ADVERTISEMENT

२२ आमदार फुटणार या दाव्यावर शिंदे गटाने काय म्हटलं आहे?

दुसरीकडे, कडकनाथ मुंबैकरांचे २२ आमदार फुटणार असल्याचा दावा शिंदे गटाने फेटाळून लावलाय. पण पहिल्यांदाच शिंदे गट फुटणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. आता हे सगळं कुठल्या दिशेने जाणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT