भिवंडी फर्निचरच्या गोदामाला आग, तीन गोदामं जळून खाक

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

भिवंडीत आगीचे सत्र काही थांबताना दिसत नाहीये, भिवंडी ग्रामीण भागात आज पुन्हा एकदा अग्नितांडव पाहायला मिळालं. तालुक्यातील कशेळी गावच्या हद्दीत असलेल्या चामुंडा कॉम्पलेक्स परिसरात फर्निचर मार्केटमध्ये फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचर गोदाम जळून खाक झालं आहे. ही आग एवढी भीषण होती की या आगीने इतर दोन फर्निचर गोदामांना आपल्या भक्षस्थानी घेतलं. अशा पद्धतीने या आगीत तीन गोदाम आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत.

आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी भिवंडी आणि ठाणे महापालिकेच्या दोन-दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. परंतू आगीची तीव्रता पाहता ही आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाला चार ते पाच तासांचा कालावधी लागला. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असल्याचा अंदाज आहे. या आगीत मोठ्या प्रमाणात फर्निचर बनवण्याचं साहित्य आणि फर्निचर जळून खाक झालं आहे.

आग लागल्याची घटना कळताच पहिल्यांदा स्थानिकांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतू ही आग अवाक्याबाहेर वाढत जात असल्याचं लक्षात येताच त्यांनी अग्नीशमन दलाला पाचारण केलं. भिवंडी शहरात गेल्या काही दिवसांपासून आग लागण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे या आग लागतात की लावल्या जातात असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT